आयुष्मान कार्ड विषय जनजागृती करावी;दीपक सोनुने प्रभारी अधिकारी

 


प्रतिनिधी // साई चंदनखेडे


 पेरमिली;-ग्रामीण भागात आजही शारीरिक त्रास असह्य झाल्याशिवाय नागरिक रुग्णालयाच्या पायऱ्या चढत नाहीत. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. हे टाळता येऊ शकते. संभाव्य आजारांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी पंतप्रधान आरोग्य आयुष्यमान योजना प्रवाहात आणण्यात आली ७ फेबु्रवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वोपचार पेरमिलीच्या परिसरात दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना किरकोळ असो वा गंभीर स्वरूपाच्या आजारावर सर्व प्रकारचे उपचार मोफत बदल माहिती देण्यात आली  गाववासीयांनी या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी दीपक सोनुने तर प्रियंका बावणे पोलीस निरीक्षक, तर सीआरपीएफ अधिकारी अमलदार उप पोलीस स्टेशन पेरमिली यांची सुद्धा उपस्थिती दर्शवली रोजी - पेरमिली येथे नाकाबंदी दरम्यान ग्रामभेट घेतली असता सदर ग्रामभेट दरम्यान गावातील 40 ते 50 नागरिक उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित 40 नागरिकांची BP व sugar वैद्यकीय तपासणी* करण्यात आली तसेच *29 नागरिकांना आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व 26 नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड* काढून देण्यात आले, तसेच विविध शासकीय योजना व रोजगार प्रशिक्षणा बाबत तसेच पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम व प्रशिक्षण याबाबत माहिती देण्यात आली  व  त्याचा लाभ घेण्याचे आवाहन व मार्गदर्शन करण्यात आले तसेच नागरिकांसोबत स्थानिक भाषेत संवाद साधण्यात आला

   सदर वेळी नागरीकांना पाणी बॉटल  वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments