तहसील कार्यलयातील त्या जप्तीच्या अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रका गेल्या कुठे परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे चेक करणे गरजेचे

 





एटापल्ली:- एकेकाळी दुर्लक्षित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची सद्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. तेही गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लोहखान लागल्यामुळे अधिकच गुंतवणूकदारांचे व मंत्र्यांचे आकर्षण वाढले आहे.

     सुरजागड येथे मुख्य भूमिकेत असलेली लॉयल मेटल कंपनी या कंपनीच्या हजारो ट्रका चालत असतात, असाच एक प्रकार एटापल्ली तालुक्यात ४ फेब्रुवारीला घडला,त्या चार तारखेला दुपारच्या सुमारास लॉयल मेटल कंपनीच्या दोन रेती वाहतूक करणाऱ्या ट्रका एटापल्ली तहसील कार्यालयाला जमा होतात आणि काही वेळातच तिथून त्या ट्रका गायब होतात.

    सविस्तर असे की, गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या एटापल्ली उपविभागात दि.०४/०२/२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही करताना दुपारी १२:०० ते १:३० दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक तहसील कार्यालय, एटापल्ली येथे आणण्यात आले परंतू त्या हायवा ट्रक वर कुठलीही कार्यवाही न करता सोडण्यात आले.




  तरी त्या परिसरातील लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच संपूर्ण केलेली कार्यवाही तसेच त्यासाठी वापरात आणलेले आदेश, टीपी यांचे तपासणी करण्यात यावे. तसेच यामध्ये शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर त्यावर फौजदारी गुन्हा नोंदवावा. शासकीय अधिकारी यांच्यावर म.ना.से. (शिस्त व अपील) १९७९ अन्वये कार्यवाही करण्यात यावी व याची विभागीय चौकशी करावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण वाघाडे यांनी प्रधान सचिव महसूल विभाग मंत्रालय यांना केली आहे

Post a Comment

0 Comments