सुरुवातीलाच विजेचा लपंडाव भर उन्हाड्यात हाल कशे कर्मचारी मात्र वीजवसुलीच्या मागे


 




गोमनी;- परिसर हा वर्षभर कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे नेहमीच चर्चेत असतो.


यात महत्वाचा विषय म्हणजे वीज. नेहमीच वीज गेली की जनजीवन विस्कळीत  होते. मग प्रश्न इंटरनेटचा असो की कव्हरेजचा.

यातच मुख्य प्रश्न पडतो उन्हाळ्याचा. दरवर्षी प्रमाणे 

उन्हाळ्याची शुरुवात होताच गोमनी परिसरात विजेचा लपंडाव सुरु होतो,याकडे ना कर्मचारी लक्ष देतात ना अधिकारी.मात्र विज कर्मचारी आपल्या विजबिलाच्या वसुलीत व्यस्त असतात. वारंवार विज कर्मचाऱ्यांना निदर्शनास आणून देऊन सुदधा विजकर्मचारी या गोमणी परिसरातील वीज समस्येकडे जातीने लक्ष देत नाहीत, ही या भागातील खूप मोठी शोकांतिका आहे.या मध्ये सामान्य नागरिकांची पिडवणूक मोठ्या प्रमाणात होते हे मात्र नक्की.


वीजबिल भरमसाठ हा मोठा प्रश्न ?


गोमनी परिसरात बारमाही विजेची समस्या असताना सुद्धा वीजबिल मात्र भरमसाठ येत असतो वापर कमी आणि वीजबिल जास्त येत असल्यामुळे सामान्य जनता ही त्रस्त झाली आहे,.वीजबिल येऊन एक हप्त्यात बिल न भरल्यास कर्मचारी घरी येऊन वीजबिल न भरल्यास तुमची लाईन कट केली जाईल अशी धमकी देत असतात, भीतीपोटी सामान्य नागरिकांना जुडवा जुडवी करून वीजबिल भरणा करावे लागते.



विजकर्मचारी हा गोमनी परिसरातील दादला


काम शून्य मात्र वीज कर्मचाऱ्यांचा गोमनी परिसरात दबदबा मोठ्या प्रमाणात आहे,सामान्य नागरिक पोलीस प्रशाषणाला जितकी घाबरत नाही तितकी येथील विजकर्मचाऱ्यांना घाबरते एका एकी पोलीस विभाग समजुती घेईल परंतु विजकर्मचारी आपली भूमिका बदलवत नाही तू कुठूनही पैसा आन आणि वीज बिल भर म्हणजे भर अशी भूमिका वीजकर्मचाऱ्यांची आहे,जणू गोमनी परिसरात वीज कर्मचारी हा दादलाच आहे.



कंत्राटदारांच्या वीज चोरीकडे वीज कर्मचाऱ्यांची अन् अधिकाऱ्यांची बघ्यांची भूमिका



गोमनी परिसरात वीज समस्या ही गंभीर बाब असतांना सुद्धा कंत्राटदाराला सरकारी बांधकामात विजकर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा आश्रय आहे,संबंधित अधिकाऱ्यांना  सरकारी बांधकामात वीज चोरी होत असल्याचे  निदर्शनात आणून दिल्यावर सुद्धा त्या कंत्राटदारावर कारवाही करायला तयार नाही,

यात कुठेतरी साठगाठ झाली असल्याचे सिद्ध होते आणि यात सामान्य माणूस पिसला जातो.



वीज कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे उत्तर


सदर वीजचोरीची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर कर्मचारी व अधिकारी हे बघू, चौकशी करु, कार्यवाही करू असे तात्पुरतीचे व उडवा उडावीचे उत्तर देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात.


आम्ही साहेबांना सांगतो मग एक दिवस साहेबांना घेऊन येतो आणि कारवाही करतो, साहेब तर येत नाही कारवाही तर होत नाही, कंत्राटदार आपला काम करून मोकडा होतो आणि वीज कर्मचारी देखील.



Post a Comment

0 Comments