बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळावा

           




  ब्रम्हपुरी प्रतिनिधी//अनिल कांबळे

 : माता रमाई बुध्दीझम परियणय ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने रविवार दि.  ३० मार्च २०२५ ला सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथे बौद्धधधम्मीय उपवर - वधु परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            सद्या धकाधकीच्या जीवनामध्ये भेटीगाठी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे एकमेकांसोबत बरेच दिवस भेट होत नसल्याने एकत्र आणण्याकरीता तसेच समाजातील पालक आणि उपवर- वधुसाठी हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधव एकत्रित यावे आणि उपवर- वधु यांचा परिचय होऊन लग्नगाठ बांधण्याचा उद्दात हेतू आहे.

                                                                             या मेळाव्यामध्ये युवक युवतीचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधू यांची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी मेळाव्याच्या दिवशी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान करण्यात येईल. उपवर-वधु यांनी मेळाव्यात येताना एक फोटो सोबत आणावा. या मेळाव्यात उपवर-वधु घटस्फोटित वधु-वर विधवा -विधुर वधु-वर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक घनश्याम रामटेक यांनी कळविले आहे

Post a Comment

0 Comments