हिद्दूरजवळ पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

 काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर - नारायणपूर - गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत 

     त्यावरून मा अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री.यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक  हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 19:00 वाजता जोरदार नक्षल्यांकडून गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता - पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे


Post a Comment

0 Comments