शेतकऱ्यांकडून अतिरिक्त धान खरेदी होत असल्याबाबत थेट प्रणय खुणे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन




गडचिरोल्ली;-आदिवासी विभागामार्फत आदिवासी महामंडळातर्फे शेतकऱ्यांकडून अतिरिक्त धान खरेदी होत असल्याबाबत चौकशी करण्यासाठी.



थेट मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असो नई दिली प्रदेश अश्याक्ष प्रणय खुणे यांनी निवेदन दिला आहे

सदर निवेदनात अशे म्हटले आहे की




आदिवासी महामंडळ मार्फत चालू असलेल्या प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली अंतर्गत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक केली जात आहे. 


या बाबत जर कोणी शासनाच्या परिपत्रकाची गोष्ट केली तर केंद्र बंद करण्याची केंद्रप्रमुख शेतकऱ्यांना धमकी देतात. शासनाच्या



 परिपत्रकानुसार प्रति बारदाना ४० किलो ६०० ग्राम खरेदी करावे असे सांगितले आहे तसेच धानाची खरेदी करताना प्रति बारदाना हमाली सुद्धा शासन देणार हे सांगितले आहे.


परंतु आदिवासी महामंडळच्या अभिकर्त्या मार्फत शेतकऱ्यांकडून प्रति बोरा ४१.६०० किलोने खरेदी सुरू आहे. तसेच प्रति बारदाना ६ ते ८ रुपये इतकी हमाली सुद्धा शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जात आहे. आमचे शेतकरी मेहनत करून अगोदर नोंदणी केले


 परंतु अभिकर्त्या मार्फल अगोदर व्यापाऱ्याचा धान खरेदी केला जात आहे त्यामुळे शेतकन्यांचे धान घरी जागा नसल्याने बाहेर उंदीर, घूस यांच्याकडून नासधूस केली जात आहे.



आमचा शेतकरी आक्रमक नसल्याने यांच्या विरोधात जाण्यस घाबरतो कारण आपण जर तक्रार केली तर आपला धान खरेदी केला जाणार नाही. त्यामुळे मा. ना. मुख्यमंत्री साहेब आपण या अश्या खरेदी केंद्रांची आपल्या यंत्रणे मार्फत नियंत्रण ठेवून आमच्या शेतकरी बांधवाना न्याय द्याल हि अशी निवेदनातून विनंती केली आहे

Post a Comment

0 Comments