एटापल्ली मार्गावर पोलिसांनी सापडा रचून देशी दारू

#khabardarmaharashtra#onlinenewsportal#crime





अहेरी;-अहेरी वरून आलापल्लीमागनि एटापल्ली कडे जाणारी चारचाकी पीकअप वाहन क एम एच ३४ ए.व्हि २०७१ या वाहनाने देशी दारूची तस्करी करीत असल्याची माहीती मीळाल्याने पोलीस पथकाने मौजा आलापल्ली एटापल्ली रोडवर येथे सापळा रचुन दिनांक 16 /2/2024 ला सदर वाहनास थांबवुन सदर वाहणाची पंचा समक्ष पाहणी केली असता सदर वाहनाच्या डाल्यामध्ये खाकी रंगाच्या बाॅक्समध्ये रॉकेट देशी दारू संत्रा प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर असे लिहीलेले किंमत २,८०,०००/- रूपये किमतीच्या दारू व १,००,०००/- रू किमतीची चारचाकी पिकअप वाहन असा एकुन ३,८०,०००/-रू किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने पोस्टे अहेरी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे सदर गुन्हयाच्या तपास पोहवा/ सत्यमकुमार लोहबरे पोस्टे अहेरी हे करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश सा,अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधीकारी अजय कोकाटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे साहेब यांचे नेतृत्वात पोहवा/मनोज शेन्डे, पोना/ हेमराज वाघाडे, पोशी/ आशीष भारतसागर पोशी / शंकर दहीफळे पोस्टे अहेरी यांनी पार पाडली असुन अवैदयरित्या तस्करी होणारी देशी दारू पोलीसांनी जप्त केली असुन गुन्हयातील आरोपींस ताब्यात घेतले असुन इतर साथीदारांच्या शोध घेत असुन गुन्हयाच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा / सत्यमकुमार लोहंबडे पोस्टे अहेरी यांनी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments