वनविभागाच्या सभागृहात एक दिवसीय कार्य शाळा संपन्न सांज मल्टी ऍक्टिव्हिटी स्वस्थेचा उपक्रम





भामरागड;-अतिदुर्गम मागास भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी , स्पर्धा परिक्षेत यश मिळवता यावे या करिता सांज मल्टी ॲक्टीव्हीटी डेव्हलपमेंट इन्स्टीटयुट यस्टर एरीया बिनागुंडा स्थित भामरागड या


 स्वयंमसेवी सामाजीक संस्थेव्दारा एक दिवशीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन वनविभाग सभागृह भामरागड येथे करण्यात आले.कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मा.अमर मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी पो.स्टे .भामरागड उपस्थित होते.


प्रमुख पाहुने म्हणुन जयदेव घनश्याम मडावी (शारीरीक शिक्षण) उपस्थित होते.सर्वप्रथम क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना स्पर्धा परिक्षेची तयारी पुर्वी सर्वप्रथम आपले ध्येयपुर्ती करिता निरंतर अभ्यास गरजेचा आहे. विद्यार्थ्यी जिवनात प्रत्येक विद्यार्थ्यांने इतर सर्व बाबीकडे दुर्लक्ष करुन अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबीकडे विशेष लक्ष दिल्यास स्पर्धा परिक्षेत यश मिळवुन शासन सेवेत नौकरी मिळवता येते.कार्यशाळेत 68 विद्यार्थ्यी – विद्यार्थ्यीनीने  उपस्थित दर्शविली.त्यानंतर संस्थेमार्फत भामरागड टॅलेंट सर्च स्पर्धा परिक्षा दरवर्षी घेण्यात येते .या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी 1) कु.संजिवनी चांदेकर 2) कु.प्रनीता जुवारे 3) राहुल बावने यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या मैदानी खेळातील विजेत्या संघातील कबडडी चॅम्पीयन (कप्तान ) गौरी साईनाथ मज्जी 100 मिटर ,रनिंग कु.चांदणी जेटटी भालाफेक स्पर्धा कु.लक्ष्मी मज्जी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारीतोषीक देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता संजय खर्चे आदीवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यानी सहकार्य केले.उपस्थित प्रमुख पाहुने तथा विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष रुपलाल गोंगले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments