अहेरी : तालुक्याच्या पेरमिली व दामरांचा या दोन गावांना जोडणारा येरमणार पूल अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. गेल्या वर्षी या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. पण यावर्षीचा पावसाळा आटोपल्यानंतर अजूनही पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने यावर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा हा पूल नागरिकांच्या सेवेत येण्याची शक्यता कमी दिसत आहे.
पेरमिली येथून दामरांच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर या पुलाची निर्मिती होत आहे येरमणार गावादरम्यान असलेल्या मोठ्या नाल्यावर हा फुल तयार होता हा पूल विशिष्ट पद्धतीचा आहे. बेली ब्रिज प्रकारात मोडणारा हा पूल आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला या पुलाचे काम कंत्राटदाराने हाती घेतले होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुलाचे काम थांबवण्यात आले. सध्या स्थितीत पूलाच्या दोन्ही बाजूचे पिलर उभे करण्यात आले आहे. पुलाला लागणारे लोखंडी साहित्य येथे आणून टाकण्यात आले आहे. पावसाळा आटोपून एक महिन्याचा कालावधी आटोपला असला तरी या पुलाचे काम हाती घेण्यात आले नसल्याने हा पूल कधी पूर्णत्वास जाईल असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
पेरमिली व दामरांच्या या 22 किलोमीटरच्या रस्त्याला जोडणारा हा पूल आहे. या 22 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जवळपास 25 गावांचा समावेश आहे. यात दामरांच्या सहित भंगाराम पेठा, मांढरा, तोंडेर, कोळसेपल्ली,रुमालकसा समावेश होतो.
सदर पुलाचे कंत्राट नागपूर येथील एका कंत्राटदाराने घेतली आहे. पावसाळा आटोपल्यानंतर सदर कंत्राट दाराने अजून पर्यंत पुलाच्या कामाला भेट दिली नाही. स्थानिक मजूर वर्गाच्या माध्यमातून सुद्धा कामाला सुरुवात केली नाही.जवळपास एक करोड च्या दरम्यान किंमत असलेला हा महत्त्वपूर्ण फुल आहे
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
या पुलाच्या बांधकामा संदर्भात माहिती काढली असता सदर पूल पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत असल्याची माहिती मिळाली. पुलाच्या बांधकामात उशीर होत असला तरी या विभागाचे अभियंते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचा एकही अभियंता या पुलाच्या बांधकामाकडे फिरकला नसल्याची माहिती एरमनार गावातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली. कंत्राटदार आणि अभियंते यांना जनतेच्या समस्या शी काहीही घेणेदेणे नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.
निर्माण धीन पुला च्या बाजूला जुना पूल आहे. नवीन पुलाच्या निर्मितीमुळे जुना पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुल निर्मिती करण्यात येत असली नाला मोठा असल्याने तुटका फुटका वळण रस्ता तयार करून दुचाकी निघेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार चाकी वाहन येथून जाऊ शकत नाही यामुळे जनता त्रस्त झाली आहे.म्हणून या पुलाच्या बांधकामाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांची आहे.
0 Comments