कमलापुर : कमलापुर - रेपणपल्ली दरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा खड्डा जीवघेणा ठरला आहे. या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कमलापुर व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कमलापुर - रेपनपल्ली असा चार किलोमिटर चा रस्ता आहे. पुढे हा रस्ता दमरांचा , पेरमिली अशा परिसरातील 25 गावांकडे जातो. या गावातील शेकडो नागरिक या रस्त्याने प्रवास करतात. या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना खड्डा दिसत नसल्यानं किरकोळ अपघात झाले आहेत. नाल्यावर असलेला हा पूल अरुंद आहे. फक्त एक वाहन या पुलावरून जाते. अशा अवस्थेत पुलाला खड्डा असल्यानं एखादी व्यक्ती दुचाकी सह पुलाच्या खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येते
0 Comments