वंचितच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षांच्या लेटरबॉम्ब ने काँग्रेसची वाढली अडचण




#khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#education#entertainment#crime#political#



गडचिरोली;-महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यास गडचिरोली- चिमूर लोकसभेची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी घेण्यात यावी अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे  वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या वतिने  जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी पाठविले आहे.

 गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र अनुसूचीत जमातीसाठी राखीव असून सुध्दा या आदिवासीबहुल मागासलेल्या जिल्ह्याचा विकास करण्यात सत्ताधारी व विरोधी पक्ष कुचकामी ठरले आहेत परंतु संधी मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या प्लॉटफार्मवरून निवडून जाणारा खासदारच या जिल्ह्याची मागासलेली ओळख मिटवू शकतो अशी तिव्र भावना जिल्ह्यातील आदिवासी, बहुजन, दलित, अल्पसंख्यांकाची असल्याने या जागेचा आग्रह आहे.

 गेल्या दोन पंचवार्षीक पासून कॉंग्रेस या जागेवर सातत्याने हरत आलेली आहे, अनुसूचीत जमातीतील माणूस निवडून येऊन सुध्दा ज्या आदिवासींनी जल-जंगल-जमिनीचे संवर्धन केले आहे त्यांच्यावरच मोठ्या प्रमाणात अन्याय केल्या जात आहे, ओबिसींच्या आरक्षणावर तोडगा निघत नाही आहे, पेसाची अंमलबजावणी मागे पडलेली आहे, परकिय कंपन्यांनी जिल्ह्यावर आक्रमण केलं आहे, खनिज उत्खनन करणा-या कंपन्यात स्व जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी परकिय जिल्ह्यातील व पर राज्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिल्या जात आहे, विकासाच्या नावाखाली कंपन्यांच्या माध्यमातून शेतक-यांच्या हजारो हेक्टर जमिनी जोर जबरदस्तीने कवडी मोल भावात विकत घेऊन भूमिहीन केल्या जात आहे, हजारो हेक्टरवरील वनांची कत्तल   केल्या जात आहे ईतके मोठे शोषण जिल्हावासियांचे होत असतांना सुद्धा सत्ताधारी व विरोधी  खासदार- आमदार सुरजागड -झेंडेपार या खानी  सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याचे समजून मूग गिळून बसले आहेत. त्यामूळे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या विरोधात संपूर्ण जिल्हाभर संतापाची लाट व असंतोष आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीला संधी मिळाल्यास या क्षेत्रातून आपला उमेदवार हमखास निवडून येऊ शकतो, आपल्या पक्षाकडे सामाजीक क्षेत्रातील वजनदार तिन उमेदवारानी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेण्याची प्रबळ ईच्छा व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीसोबत युती झाली तरी आणि आपण स्वतंत्र लढलो तरी ताकदिनीशी विजयाची पताका फडकविण्याची तयारी आहे, तरी आपण महाविकास आघाडी सोबत युती झाल्यास ही जागा वंचित बहुजन आघाडीसाठी मागावी, आपण जो निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य आहे. असेही एड. आंबेडकरांना पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे .

Post a Comment

0 Comments