जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय गरोदर माता महिला मेळावा संपन्न सांज मल्टी ऍक्टिव्हिटी संस्थेचा अभिनव उपक्रम

 


 


भामरागड;- दिनांक 8 मार्च ते 31 मार्च या कालावधीत संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांज मल्टी ऍक्टिव्हिटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरिया या सामाजिक स्वयंसेवी संस्थेद्वारा मौजा भामरागड येथे दिनांक 28 ते 29 मार्चला दोन दिवसीय गरोदर माता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात प्रधानमंत्री मातृत्व वय वंदना योजनेचा लाभ हस्तांतरणा करिता मोफत पोस्ट ऑफिस DBT खाते सुरू करण्यात आले. मेळाव्यात अतिदुर्गम भागातील योजनेच्या लाभांपासून वंचित 58 गरोदर मातांना घेऊन आशा वर्करनी उपस्थिती दर्शवली. त्यातील 50 गरोदर मातेचे मोफत DBT खाते सुरू करून गरोदर मातांना  DBT खाता कार्डदेण्यात आला व  लाभ हस्तांतरणाकरिता  DBT खात्यासह गरोदर मातांची यादी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली. लवकरच प्रधानमंत्री मातृत्व वय वंदना योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरण करण्यात येईल असे डॉ. मनीष धकाते ,तालुका वैद्यकीय अधिकारी भामरागड  यांनी सांगितले.

मेळाव्या करिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. अनमोल चवरे , DBT खाते सुरू करण्याकरिता भारतीय डाक विभाग भामरागड येथील कर्मचारी सुप्रिया प्रसाद, भुवनेश्वरी सहारे, सोनाली वरखडे, निलेश शेजुळ, प्रवीण मज्जी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा वर्कर यांनी अथक परिश्रम घेतले. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वैवाहिक जीवन जगत असलेल्या पती-पत्नीच्या विवाहाची नोंद ग्रामपंचायतीत नसल्यामुळे व आवश्यक पुरावे नसल्यामुळे  बऱ्याच महिलांकडे पतीच्या नावासह आधार कार्ड नाही या गंभीर बाबीमुळे अतिदुर्गम भागातील अशिक्षित महिलांना व आशा वर्कर्स ना बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शासन प्रशासनांनी या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देवुन  मार्ग काढून द्यावा अशी मागणी मेळाव्याचे आयोजक तथा संस्थेचे संचालक कुमार रुपलाल मारोती गोंगले यांनी केले.

Post a Comment

0 Comments