अवेद्य रेती तस्करीच्या ट्रॅक्टरचा अपघात ; चालक जागेतच ठार

#khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#education#political#crime



 मोहाटोला येथे अवेद्य रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे 5.00 वाजताच्या दरम्यान मोहटोला येथिल जि.प.शाळे जवळ घडली.

 प्राप्त सूत्राद्वारे असे कळले की, चिखली येथिल अवेद्य रेती तस्कर योगेश शेंद्रे ट्रॅक्टर रेतीच्या अवेद्य तस्करी करीत असतांना रेती घाटावर ट्रॅक्टर जातांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हर ने मोहटोला येथिल जि.प.शाळेच्या भिंतीला नेऊन ट्रॅक्टर चा जोरदार अपघात केला. ज्यात ड्रायव्हर राकेश गजबे रा. पोटगांव ता. देसाईगंज याचा जागीच म्रुत्यू झाला. विशेष म्हणजे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला नंबर नव्हते. 

  तर प्रकरण सावरण्याकरीता अवेद्य रेती तस्करांने हालचाली सुरु केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.                         तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशिर्वादाने मोहटोला घाटातून दररोज अवेद्य रेती तस्करी केल्या जाते परंतु मलिन्दा मिळत असल्याने अधिकारी वर्ग सुध्दा याकडे दुर्लक्ष करतात आताच 15 दिवसापूर्वी प्रत्येक गावात जवळपास 25 ते 30 घरकुल मंजूर झाल्याने त्यांना अद्यापही शासनाने रेतीची पूर्तता केली नाही त्यामुळे त्यांना चोरीची रेती घेतल्या  



शिवाय पर्याय नाही, अश्यानांही  शासनाने रेती दिली असती तर तसेच अधिकाऱ्यांनी तस्करांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर सदर अपघात घडला नसता अशी मोहटोला व परिसरात चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments