ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्च



     ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे 

 ब्रम्हपुरी;-लोकसभा निवडणूक 2024 तसेच आगामी सण उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी तर्फे ब्रह्मपुरी शहरात आज दिनांक 12/04/2024 रोजी 12/00 वा ते 13/30 वा दरम्यान ब्रह्मपुरी शहरातील बाजार चौक, भवानी माता मंदिर, फाशी चौक, खोब्रागडे चौक, गांधीनगर, देलनवाडी ख्रिस्त आनंद चौक, शिवाजी चौक, सावरकर चौक, बाजार चौक मार्गे पोलीस स्टेशन येथे समाप्त करण्यात आला.  सदर रूट मार्च   पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी श्री दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक नागभीड विजय राठोड, सहायक पोलीस निरीक्षक सिंदेवाही तुषार चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक तळोधी अजित देवरे यांचे प्रमुख उपस्थितीत काढण्यात आला. तसेच रूट मार्च करिता एकूण तामिळनाडू पोलीस दलाचे 60 जवान, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथील 20 पोलीस अंमलदार तसेच 10 होमगार्ड सैनिक हजर होते.

    

Post a Comment

0 Comments