जिल्हा प्रतिनिधी // मारोती कोलावार
*#khabardarmaharashtr#onlinenewsnetwork#social#education#political#entertainment#
मुलचेरा - रोशन वामन दुर्गे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणान्या 2022 वर्षातील कर सहाय्यक या पदावर निवड झालेली आहे. रोशन वामन दुर्गे हैं गडचिरोली जिल्हयातीठ मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील रहिवासी आहेत. घरची परिस्थिती हलाकीची असतांना देखिल रोशन चे वडील मोलमजूरी करून रोशनला शिकविले. वामन दुर्गे यांना एकून, चार अपत्य आहेत मोठा मुलगा किशोर दुर्गे हे मोल मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात दुसऱ्या क्रमांकाची मुलगी ही सुद्धा शिक्षण घेऊन आरोग्य विभागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. रोशन पेक्षा
मोठा भाऊ हा देखील शिक्षण पूर्ण करून रेल्वे विभागात कार्यरत आहे. रोशन हा लहानपणापासूनचं हुशार होता आणि त्याला शिक्षणात आवड होती म्हणून तो सतत वेगवेगळ्या विभागातील परिक्षा देत असायचा, लोकसेवा आयोगाच्या कर सहायक परीक्षेत यश मिळविण्याआधी तो राज्यशासनाच्या महत्वकांशी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या उपक्रमात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून
चंद्रपुर जिल्हयातील चंद्रपुर व जिवती या दोन तालुक्यात साडे तीन वर्षे ग्रामिन, भागाच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे. सध्या ते विशेष राज्यकर आयुक्त कार्यालय माझगावं, मुंबई येथील मुख्यालयात नियुक्त आहेत. त्याचे शिक्षण बी.ई (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), एम.एस. डब्ल्यू, नेट एवढे झालेले असून राज्यसेवा परिक्षेत यश मिळविण्याची आकांशा आहे. कर सहाय्यक पदी निवड झाल्यामुळे सर्वत्र रोशनचे कौतुक केल्या जात आहे

0 Comments