वंचित बहुजन आघाडी उमेदवार हितेश मडावी यांची पत्रकार परिषद





ब्रह्मपुरी प्रतिनिधी// अनिल कांबळे



गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक हितेश पांडुरंग मळावी यांनी घेतली पत्रकार परिषद

कोणती निवडणूक ही लोकशाहीमध्ये सत्ता बदलासाठी महत्त्वाची असते यात कोण गरीब कोण श्रीमंत असा भेद नसतो प्रत्येकाला समान मताचा अधिकार आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला आहे याचा योग्य उपयोग करणे ही आता आपली जबाबदारी आहे या देशांमध्ये महागाई बेरोजगारी हुकूमशाही ही आता नव्याने सांगण्याची गोष्ट राहिली नाही नोटबंदी जीएसटी शेतकरी आंदोलन सीएए एनआरसी कामगार कायद्यातील बदल या गोष्टी देखील आज सर्वसामान्य जनतेला समजलेल्या आहेत निवडणूक खरेदी रोखे इलेक्ट्रॉल बांड हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल पंतप्रधान सहाय्य निधी किती रक्कम जमा झाली आणि कुणी जमा केली यांची माहिती लपविणाऱ्या भाजप आरएसएसने अघोषित आणीबाणी दिवसभर राबविली आहे अशावेळी त्यांची मग्रुरी आणि हुकूमशाही थांबवण्याची असेल तर निवडणूक ही एक चांगली संधी आपल्याला मिळाली आहे यापुढे देशात निवडणुका होतील न होतील माहित नाही पण लोकशाही शासन व्यवस्था कायमची ठेवायची असेल आणि निवडणूक व्यवस्था टिकवून ठेवायची असेल संविधान शाबूत ठेवावे असेल तर आपल्याला भाजप आरएसएसला सत्तेत जाण्यापासून रोखण्याची ही आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे सर्वच क्षेत्रातील स्त्री-पुरुषांनी नव्याने वयाची 18 वर्षे पूर्ण करून जे नव मतदार झाले आहेत त्या सगळ्यांनी सुशासन आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे यावेळी त्यांनी सांगितले वंचितला एक संधी देऊया आपले मतदान आता आपल्याच पक्षाला आणि उमेदवाराला करूया एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्व समावेशक विकासाचे स्वप्न साकार करूया वंचित बहुजन आघाडी हा आपला सगळ्यांचा हक्काचा पक्ष आहे कोणत्याही प्रस्थापित पक्षाने आम्हाला वंचित बहुजन दलित ओबीसी आदिवासी मुस्लिम धनगर साडी माळी कोळी गरीब मराठा या सगळ्या वंचित समूहांना कधीच सत्तेत वाटा दिला नाही त्यांना त्यांची घराणेशाही वाचवायची आहे आपल्याला संविधान आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही वाचवायची आहे जशी रस्त्यावरची लढाई आवश्यक असते तशी संसदेत देखील आपल्या न्याय हक्कासाठी झगडावे लागते संसदेत आपला आवाज उठला पाहिजे असे वाटत असेल तर वंचित बहुजन आघाडीला साथ द्या ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दोघांची त्यांच्या हक्कासाठी सत्ता परिवर्तनाचा लढा उभारला आहे तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सगळ्याची आहे तुमचे एकमत परिवर्तन घडवू शकते आज नाहीतर कधीच नाही हे लक्षात घ्या वंचितला साथ द्या वंचित ला मत द्या विजय आपलाच आहे अशा पद्धतीने उमेदवारांनी आपले विचार मांडले यावर ब्रह्मपुरी तालुक्याचा क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू या पत्रकार परिषदेमध्ये कित्येक पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे उमेदवारांनी सदसदविवेक बुद्धीने व योग्य प्रमाणे उत्तर देऊन त्यांचे स्वांत्वना केली आहे ब्रह्मपुरी सारख्या विद्यानगरीत आणखी शिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करू बेरोजगारांना काम मिळाल्या पाहिजे म्हणून एमआयडीसी सुरू करू या भागातील जलसिंचनाचे काम विद्युतीकरणाचे काम असे असंख्य जे प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लागू अशा पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये प्राध्यापक हितेश पांडुरंग म्हणावी यांनी सांगितले आहे पत्रकार परिषदेमध्ये ब्रह्मपुरीचे बरेच पत्रकारांची उपस्थिती होती तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्त्री आणि पुरुष कार्यकर्ते युवा कार्यकर्ते यांच्या समक्ष उमेदवारांनी पत्रकार परिषद घेतली

Post a Comment

0 Comments