पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्रात केला देशी व विदेशी दारुसह एकुण 26,75,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त




आचार संहितेच्या कालावधीत 16 मार्च ते आजपावेतो एकुण 1.82 कोटी रु. दारु व मुद्देमाल जप्त


गडचिरोली;- जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 09/05/2024 रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे मोकळ्या जागेत रोडवर एक पांढ­या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्र. एम.एच – 31 सी.पी. – 3826 ही देशी विदेशी दारुच्या पेट¬ांनी भरुन ठेवण्यात आली आहे. अशी गोपनिय बातमीदारंाकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी तत्कालीन प्रभारी अधिकारी पोउपनि. बालाजी लोसरवार यांच्या नेतृत्वात पोउपनि. दुर्योधन राठोड, मपोउपनि. राधा शिंदे, चापोना/मनोज सिंधराम व मपोना/ताडाम सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले.  पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच मोकळ्या जागेत रोडवर एका पांढ­या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन दिसुन आल्याने जवळ जाऊन पाहिले असता, सदर वाहनाजवळ असलेले दोन इसम पोस्टे स्टाफला पाहून पळून गेले.

त्यानंतर सदर वाहनाची पाहणी केली असता, वाहनात मध्यभागी तीन खाकि रंगाच्या खरडा बॉक्समध्ये प्रत्येकी 100 प्रमाणे 90 एम.एल. मापाच्या एकुण 300 नग विदेशी दारुच्या काचेच्या सिलबंद निपा, प्रति निप अवैध विक्री किंमत 150/- प्रमाणे 45,000/- चा मुद्देमाल, मागच्या सिटवर 38 खाकि खरड¬ाचे बॉक्स प्रति बॉक्स 100 निपा प्रमाणे 90 एम.एल. मापाच्या एकुण 3800 नग देशी दारु संत्राच्या प्लॅस्टिक सिलबंद निपा, प्रति निप अवैध विक्री किंमत 80/- प्रमाणे एकुण 3,04,000/- चा मुद्देमाल तसेच विदेशी व देशी दारु वाहतुक करण्याकरीता वापरण्यात आलेली पांढ­या रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम एच – 31 सी पी – 3826 जुनी अंदाजे किंमत 4,00,000/- रुपये असा एकुण 7,49,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  सदर गुन्ह्रात अज्ञात दोन इसम हे घटनास्थळावरुन फरार झालेले असल्याचे दिसुन आल्याने पोलीस स्टेशन चामोर्शी येथे सदर अज्ञात चालक मालकाविरुद्ध कलम 65 (अ), 98, 83 म.दा.का. अन्वये पोस्टे चामोर्शी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्रातील पुढील तपास मपोउपनि. राधा शिंदे करीत आहेत.  






यासोबतच दिनांक 10/05/2024 रोजी पोलीस स्टेशन आष्टी हद्दीमध्ये गोंडपिपरीकडून घाटकूर मार्गाने आष्टीकडे एका चारचाकी वाहनाने दारुची वाहतुक होणार आहे. अशा पोलीस स्टेशन आष्टीचे प्रभारी अधिकारी श्री. विशाल काळे यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन पोउपनि. दयाल व पोस्टे स्टाफ हे आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाजवळ योग्य बॅरेकेटींग करुन रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसले.  तेव्हा एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या येतांना दिसुन आल्याने सदर वाहनास पोस्टे स्टाफ यांनी हात दाखवुन व लाल बॅटन दाखवुन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदर वाहन चालक यांनी संगनमत करुन आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन बॅरेकेटींगला धडम मारुन पोस्टे स्टाफ ला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन आणत चामोर्शी मार्गाने पळून जाताना दिसून आले. तेव्हा चामोर्शी मार्गाने सदर वाहनाचा पाठलाग करीत असतांना याबाबत चामोर्शी प्रभारी अधिकारी यांनी सदर संशयास्पद वाहनाबाबत माहिती दिली असता, पोस्टे चामोर्शी स्टाफ यांचे कडुन सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालय, चामोर्शी जवळील मुख्य सिमेंट रोडवर नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीच्या ठिकाणाहून पुढे जाण्यास रस्ता नसल्याने सदर वाहन त्या ठिकाणी थांबले असता त्यांचा पाठलाग करीत असलेले पोउपनि. दयाल हे आपल्या पोस्टे आष्टी स्टाफ सोबत नाकाबंदी ठिकाणी पोहचले असता, सदर संशयास्पद वाहनाच्या चालकास त्याचे नाव विचारले, तेव्हा त्यांनी आपले नाव नितेश वशिष्ट चंदनखेडे, वय 34 वर्षे, व्यवसाय- चालक रा. नागसेन नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर व त्यांच्या बाजुला बसून असलेल्या इसमाचे नाव निखील राजु क्षिरसागर वय 21 वर्षे, धंदा-मजूरी रा. गवराळा, गणपती वार्ड, भद्रावती जि. चंद्रपूर असे सांगितले. 



त्यानंतर पोलीस स्टाफने सदर वाहन चेक केले असता, त्यामध्ये 1) 08 बॉक्समध्ये प्रत्येकी 02 लिटर मापाच्या इंम्पेरीअल ब्ल्यु कंपनिच्या 06 बाटल्या असे एकुण 48 बाटल्या, प्रती बाटल किंमत 2000/- प्रमाणे एकुण 96,000/- चा मुद्देमाल, 2) खाकी रंगाच्या खडर्¬ाचे 40 बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 90 एमएल मापाच्या रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 100 निपा एकुण 4000 निपा, प्रति निप किंमत 80/- प्रमाणे एकुण 3,20,000/- चा मुद्देमाल, दोन नग वापरते जुने विवो कंपनीचे मोबाईल प्रति किंमत 5000/- प्रमाणे एकुण 10,000/- चा मुद्देमाल तसेच एक जुनी स्कॉर्पिओ वाहन क्र. एम एच 32 ए एच -5556, किंमत अंदाजे 15,00,000/- असा एकुण 19,26,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  सदर गुन्ह्रातील दोन्ही आरोपी नामे 1) नितेश वशिष्ट चंदनखेडे, 2) निखिल राजु क्षिरसागर यांचेविरुद्ध कलम 307, 34 भादंवी, सहकलम 65 (अ), 83 म.दा.का., सहकल 184 मो.वा.का. अन्वये पोस्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्रातील पुढील तपास पोउपनि. अतुल तराळे करीत आहेत. अशा दोन्ही विभिन्न गुन्ह्रामध्ये चामोर्शी व आष्टी पोलीसांनी देशी व विदेशी दारुसह एकुण 26,75,000/- रु. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 

दि. 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 ची आचारसंहिता सुरु झाली. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्रामध्ये बाहेरुन येणा-या अवैध दारु वाहतुकीवरती आळा घालण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात आली.  यामध्ये आचारसंहिता सुरु झाल्यापासुन ते आजपर्यंत एकुण 1.82 कोटी रुपये किंमतीची देशी/विदेशी दारु व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कार्यवाह्रा मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments