विभागीय संपादक // मारोती कोलावार
मूलचेरा;-गोमणी-ग्रामकोष समिती आंबटपल्ली, चिचेला, कोडीगाव, फुस्कीमाल,आंबटपल्ली टोला ता.मूलचेरा जि.गडचिरोली यांच्याकडून सन-२०२४करिता मे.जोत्सना मोटर्स सावली यांच्या नावे दि.२८ /११/२०२३ला करारनामा करण्यात आले आहे. ग्राम कोष समिती आंबटपल्ली, अंतर्गत आंबटपल्ली, चिचेला, कोडीगांव, फुस्कीमाल, आंबटपल्ली टोला व मे.जोत्सना मोटर्स सावली यांच्यात करारनामा करण्यात आला.
करारनाम्यामध्ये तेंदूपत्ता खरेदी पूर्ण रक्कम रु.७००/-प्रति गोणीप्रमाणे अदा करण्यात येईल.ही रक्कम संगणकाद्वारे टंकलेखनाच्या माध्यमातून लिहिण्यात आलेले आहे आणि ५००रु.मजुरी व २००रु.रॉयल्टी ही रक्कम हस्तलिखित आहे.कोणत्याही कारारनाम्यावर टंकलेखनामध्ये हस्तलेखनाद्वारे लिहीण्यात आल्यास त्या कारारनाम्याला ग्राह्य धरल्या जात नाही.
कराराप्रमाणे ७००/-रु.प्रती गोणी म्हणजे एका गोणीत १०००पुडा(मुडके) असतात तर प्रती पुडा हा ७ पैसे प्रमाणे ७० रु.शेकडा होतो म्हणजेच सरळसरळ लोकांची दिशाभूल करणे व लोकांच्या मेहनतीच्या पैशावर डल्ला मारणे होय.
हा सर्व भोंगळ कारभार १)गणेश दामोदर आत्राम अध्यक्ष ग्रामकोष समिती,आंबटपल्ली,२)तुळशीराम नामदेव कडते अध्यक्ष ग्रामकोष समिती कोडीगाव,३)गुरुदास बालाजी मडावी अध्यक्ष ग्रामकोष समिती आंबटपल्ली टोला,४)राकेश विठ्ठल सडमेक अध्यक्ष ग्रामकोष समिती चिचेला,५)शंकर मारोती सिडाम अध्यक्ष ग्रामकोष समिती फुसकी माल यांच्याकडून करण्यात आले आहे. यापैकी शंकर मारोती सिडाम अध्यक्ष ग्रामकोष समिती फुसकी माल यांना या कारारनाम्याविषयी कोणत्याच प्रकारची माहिती देण्यात आली नाही व कारारनाम्यावर यांच्या नावासमोर यांची स्वाक्षरी देखील करण्यात आलेली नाही.
आंबटपल्ली, चिचेला, कोडीगाव, आंबटपल्ली टोला येथील सर्व अध्यक्षांनी आपापल्या गावातील नागरिकांना कोणत्याच प्रकारची माहिती व पूर्वकल्पना व बैठक घेऊन माहिती न देता आपला मनमानी कारभार करून हा करारनामा करण्यात आलेला असून लोकांची फसवणूक करणारा हा करारनामा नागरिकांना मान्य नाही.
तेंदू पत्ता संकलन हे जवळजवळ१०ते १५ दिवस चालतो परंतु या १५ दिवसांच्या रोजगरामुळे पुढील चार महिण्याची शिदोरी होते म्हणजेच पावसाळ्यात नांगरणी,वखरणी, पेरणी व कापणी व इतर शेतीची कामे व सण-उत्सव याच रोजगारावर अवलंबून असतो म्हणून यंदा या कामांकरिता पैशांची जुळवाजुळव कशी करायची म्हणून नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे आणि संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
बॉक्स
ग्रामकोष समिती आंबटपली अंतर्गत आंबटपल्ली, चिचेला, कोडीगाव, फुसकीमाल, आंबटपल्लीटोला तालुका मूलचेरा यांच्या कडून मे ज्योत्स्ना मोटर्स सावली यांच्याशी करण्यात आलेला करारनामा हा चुकीचा आणि लोकांची फसवणूक करणारा आहे. करिता संबंधित ग्रामकोष अध्यक्षांवर योग्य ती कारवाही करण्यात यावी
शुभम शेंडे
ग्रामपंचायत सदस्य गोमनी
ग्रामकोष समिती अध्यक्ष गणेश दामोदर आत्राम यांनी गावातील ग्रामकोश समितीची बैठक न घेता व या करारासबंधाची कुठलीच माहिती नागरिकांना दिलेली नाही दिवाकर सडमेक रा आंबटपल्ली यांच्या संगमताने वरील करार करून लोकांची दिशा भूल करून त्यांच्या रोजगारावर डल्ला मारलेला आहे.
हरीचंद्र मराठे
अध्यक्ष-तंटामुक्ती समिती आंबटपल्ली
ग्रामकोष समिती आंबटपल्ली चिचेला, कोडीगाव,आंबटपल्ली टोला, पुस्कीमाल अध्यक्षांनी ग्रामपंचायत या करारनाम्या संबंधी कोणत्याच प्रकारची माहिती न देता गुफीत मार्गाने पैशे घेऊन करारनामा केलेला आहे.
उमेश कडते
सरपंच ग्रामपंचायत आंबटपल्ली
0 Comments