अहेरी;-अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द येथे एक विदारक दृश्य समोर आले आहे डांबर प्लांट मालकाला भीती दाखवून लाखो रुपये लुटणे तीन तलाठ्यांना भोवले आहे या संबंधित सामाजिक कार्यकते शंकर ढोलगे व संतोष ताटीकोंडावार यांनी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनातून निलंबनाची कारवाही करण्याची मागणी केली आहे
सविस्तर अशे की फौजाण युसूफ खान हे आपले डांबर प्लांट महागाव खुर्द येथे उभारत असतांना फैजान शेख यांनी डांबर प्लांटच्या बाजूलाच एमआरजीएस योजने अंतर्गत विहीर खोदकाम करतांना मुरूम टाकत असतांना व्यंकटेश जल्लेवार नामक तलाठी यांनी विचारांनी केली की या मुरूमची रायल्टी आहे काय या वेळेस फैजाण शेख यांनी
बाजूला विहीर खोद काम करत आहे अश्या प्रकारे उत्तर दिल्या नंतर तलाठी जेल्लेवार यांनी रायल्टी काढायची काही आवश्यकता नाही मला दहा हजार रुपये द्या तुमचं काम चालू ठेवा अश्या पद्धतीने उत्तर दिल्या नंतर भीती पोटी फैजाण शेख यांनी आपल्या फोन पे नी दहा हजार रुपये मारले
सदर काम चालू असतांना दुसऱ्या दिवशी सचिन मडावी चिंचुगुंडी येथील तलाठी व रवी मेश्राम कोडसेपल्ली येथील तलाठी यांनी फैजान शेख यांना धमकावून तहसीलदारांनी आम्हाला पाठविले एक लाख रुपये द्या नाही तर तुमच्या गाड्या आम्ही अंदर लावते या ही भीती पोठी शेख यांनी नगदी पन्नास हजार आणि
सचिन वर्मा नामक या व्यक्तीच्या फोन पे वरती पन्नास हजार रुपये मारले परंतु कुठेतरी आल्यावर अत्याचार झाल्याचे समजल्यावर सदर बाब ही सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे आणि संतोष ताटीकोंडावार सांगितले व या गोष्टींची शहानिशा करून
या प्रकरणाचा शहानिशा करून ह्या प्रकरणाला आज उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांच्या दरबारी निवेदनातून मांडली संबंधित दोषी तालाठ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाही करण्याची मागणी केली
निलंबनाची कारवाई करण्या साठी निवेदन देतांना. जनकल्याण समाज्योन्नती अन्याय भ्रष्टाचारनिवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा अध्यक्ष. संतोष ताटीकोंडावार.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी. शंकर ढोलगे जिल्हा अध्यक्ष,अक्षय करपे शिवसेना अहेरी तालुका प्रमुख,संजय येनगंटीवार, निलेश कोळगंटीवार, युवराज अलोने, सुजल गोंगले, अनुप माहुरकर व सर्व समितीचे पदाधिकारी उपस्तीत होते
विशेष म्हणजे
सचिन मडावी व रवी मेश्राम हे तलाठी क्षेत्राबाहेरील असून तहसीलदारांच्या नावाने खंडणी वसूल केली
जर का पथकसोबत कारवाही ला आले असता त्याच क्षणी कारवाही का केली नाही अश्या वरून असे सिद्ध होते की हे दोघेही खडणीबाज व्यक्ती असून वरिष्ठांच्या नावाने खंडणी वसूल करणारे समोरच्या दृष्टिकोणाने घातक ठरतील या खंडणी बाजांवर कोणती कारवाही होते ह्याच्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे
0 Comments