आंदोलनाच्या भीतीने अधिकारी व कर्मचारी कार्यालयाला कुलूप लावून झाले पसार




विभागीय संपादक // मारोती कोलावार

   खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


गोमणी: मुलचेरा तालुक्यातील गोमणी परिसरात अवैध रेती उत्खनन केली जात असल्याचे खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क 'च्या माध्यमातून दि. ८ में २०२४ रोजी पाहिली बातमी प्रकाशित करण्यात आली . याचीच दखल घेऊन योगाजी कुडवे सामाजिक कार्यकर्ते यांनी गोमणी परिसरातील अवैध रेती चोरीवर आळा घाला;अन्यथा वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय गोमणी येथे दि. १६ मे २०२४ रोजी एक दिवशीय लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 



   दि. १६ मे २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे आपल्या सहकार्यांसहीत गोमणी येथील वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय येथे अवैध रेती चोरीवर आळा घाला व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा असे निवेदन वजा आंदोलन करण्याकरिता आले असता संबंधित कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी आंदोलनाच्या भातीने कार्यालयाला कुलुप लावून पसार झाल्याचे विदारक दृष्य पहायला मिळाले .




    गोमणीच्या इतिहासातील हा पहिलाच आंदोलन असल्याने परिसरातील नागरीक याकडे कुतुहलतेने व उत्साहाने पाहत असतांनाच अधिकारी व कर्मचारी पसार झाल्याने त्यांच्या उत्सुकतेला पूर्णविराम लागल्याचे चित्र दिसून आले .

Post a Comment

0 Comments