ब्रम्हपुरी प्रतिनिधी /अनिल कांबळे
ब्रम्हपुरी;-१ मे रोजी जि. प. प्रा. शाळा बेलगांव जाणी येथे ध्वजारोहण करुन महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक वैकुंठ टेंभुर्णे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची माहिती सांगितली.
याप्रसंगी वार्षिक निकाल घोषित करुन, वर्ग १ ते ५ च्या सर्वाधिक उपस्थित असलेल्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याना नोटबुक बक्षिस देण्यात आले तसेच सहशालेय उपक्रमात सहभागी विद्यार्थ्याना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिंकेश्र्वर अवसरे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मच्छिंद्र मेश्राम उपस्थित होते.
उन्हाळी दीर्घ सुट्यांचे नियोजन करुन विद्यार्थ्यानी पुढील वर्गाचे पुस्तके अभ्यासावे असे आवाहन करण्यात आले.
संचालन व आभार एस. पि. परशुरामकर यांनी मानले.

0 Comments