संबंधित विभागाने केला दुर्लक्ष कंत्राटदाराने कोटमी कासनसुर रस्त्याची लावली वाट




#khabardarmahrashtr#onlinenewsnetwork#crime#social#education#entertainment#political#


एटापल्ली: तालुका अतिदुर्गम व अतिसंवेदनशील आणि आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो.स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या तालुक्याचा पाहिजे तितका विकास झालेला नाही.एकीकडे भारत देश हा आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना एटापल्ली भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते नाहीत . चांगल्या रस्त्यांसाठी या भागातील लोकांना वारंवार संघर्ष करावा लागत आहे.अशातच दरवर्षी कोट्यवधींचा खर्च रस्त्यांच्या बांधकामावर होतो. काही ठिकाणी रस्त्यांवर-रास्ता तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांवर डांबरीकरण करून कोट्यवधी निधीची उधडपट्टी केली जाते. 

 अशातच कसनसुर - कोटमी रस्त्याचे डांबरीकरण .सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील लोकांकडून रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. कसनसुर - कोटमी हा भाग अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जात असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचारी पाहिजे त्याप्रमाणे लक्ष देत नसल्याने कंत्राटदार हे याचा फायदा घेत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होण्यामागे सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


बाक्स

जनतेच्या व शासनाच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करणारे. सां.भा.विभागाचे अधिकारी कर्मचारी  व गुननियंत्रक अधिकारी व कंत्राटदारावर चौकशी करून फौजदारी खटले दाखल करावे.


   सामाजिक कार्यकर्ते

संतोषभाऊ ताटीकोंडावार

Post a Comment

0 Comments