दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी केलें अवघ्या 24 तासात जेरबंद




ब्रह्मपुरी प्रतिनिधी //अनिल कांबळे

 ब्रम्हपुरी;-दिनांक 2/5/2024 रोजी फिर्यादी कृष्णा खरवडे, वय 27 वर्ष, रा. बालाजी वॉर्ड, ब्रह्मपुरी यांनी तक्रार दिली की. दि. 1/5/2024 रोजी रात्री 11/00 वाजता घरासमोर ठेवलेली होंडा कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल MH 34 BS 2062 किंमत 40,000/-  रुपये हे कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो स्टे ब्रह्मपुरी येथे अपराध क्र. 254/2024 कलम 379 भादवि चा गुन्हा नोंद केला..

त्यावरून नमुद आरोपी व मोटरसायकलचा शोध घेत असता पोलीस स्टेशन परिसरात एक संशयीत मिळून आल्याने त्यास विचारपूस केली असता सराईत गुन्हेगार राजू बालाजी धुर्वे, वय 31 वर्ष रा. नांदेड, तालुका नागभीड असे त्याचे नाव निष्पन्न झाले व त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेली  मोटर सायकल व हिरो पॅशन क्रमांक MP 40 MD 0917 या दोन मोटर सायकल मिळून आल्याने आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन , मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार,  पोउपनि जयराम चव्हाण, पो हवा योगेश शिवणकर, नापोशी मुकेश गजबे, पो अ संदेश देवगडे, अजय कटाईत, विजय मैद यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments