विभागीय संपादक// मारोती कोलावार
मूलचेरा;-महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा असते. परंतु गोमनी परिसरात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याने वीज ग्राहकांचा मागील पंधरा दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.उन्हाचा पारा चढलेला आहे, विजेचा असा खेळखंडोबा सुरू राहिला तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर परिसरात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने गोमनी परिसरात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गोमनी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.
बॉक्स
तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात आहे. रात्रीदेखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच कूलरचा व पंख्याचा गारवा घेत आहेत. अशातच गोमनी परिसरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी द्विधा अवस्था होत आहे. वीज सेवा सुरळीत करा अन्यथा येत्या सात दिवसात त्रस्त असलेल्या नागरिकांसह वीज विभागाच्या मुख्य कार्यालयावर धळक देणार.
सामाजिक कार्यकर्ते
संतोष ताटिकोंडावार

0 Comments