मूलचेरा; परिसरात अवैध रेती उपसा व अवैध मुरूम उत्खनन करून कंत्राटदार यांनी वापर करीत असून अधिकारी कर्मचारी हे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी दिला आहे.
सदर कुडवे यांनी अशे म्हटले आहे की मूलचेरा तालुक्यातील मुखळी , बारसेवाडा परिसरात बारसेवाडा ते मुखळी या रस्त्याचे काम सुरू आहे .
महसूल विभागच्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंत्राटदार साठगाठ करून रेतीचोरी जोमात चालू आहे.
कंत्राटदार,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगमत केल्याने शासनाच्या महसुलाला कोट्यावधी रुपयाचा चुना लागत आहे. रेती ही तीन चार नाल्यातून अंदाजे 1000 ब्रास रेती उपसा करून सदर रेती पुलीया कामाकरीता वापरण्यात येत आहे.तरी सुध्दा महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कारवाही कऱण्यात केली नाही.तसेच रस्त्यांवर बारसेवाडा गावात हजारों ब्रास मुरुम उत्खनन करून रस्ता बांधकाम करिता वापरण्यात आले आहे व टाकून ठेवले आहे, त्या कंत्राटदरांकडून चिरी मिरी घेऊन महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी कारवाही करतं नाहि, शेकडो ब्रास रेती ही पुलीया मधे टाकून ठेवले आहे , असे असताना महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कारवाही न करणे हे संशयास्पद आहे,अश्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाही करावी व तात्काळ निलंबित करून ज्या ठिकाणी अवैध उत्खनन झाले आहे , त्या ठिकाणांची चौकशी करून मोका पंचनामा करावा व संपूर्ण अवैध उत्खनन झाले आहे
यास अधिकारी,कर्मचारी यांना जवाबदार धरून त्यांच्या पगारातून झालेल्या उत्खननाचा दंड वसूल करावेत.
रेतीचोरांना व अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारांना महसूल कर्मचाऱ्यांकडून आश्रय दिला जातो,पगार शासनाचा घेऊन शासनालाच चुना लावण्यास मदत करतात.
त्यामुळे या जबाबदार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली कार्यालय समोर आंदोलनं कऱण्यात येईल .त्यामुळे याची संपूर्ण जबाबदारी ही महसूल विभागाची राहिल.अशे म्हटले आहे

0 Comments