अमित अलोने यांची नागपूर येथे आरोग्य विभागात निवड





राहुल दोंतुलवार //देवलमरी ग्रामीण प्रतिनिधी


देवलमरी:- अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत देवलमारी येथील कर्मचारी अमित अलोणे याची आरोग्य विभागात निवड झाल्या बद्दल ग्रामपंचायत वतीने शाल-श्रीफळ व पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आला. सत्कार्मुर्ती अमित अलोणे याची ग्रामपंचायत देवलमारी कार्यालयात शिपाई पदावर 2018 साली निवड करण्यात आली. 

ग्रामपंचायत चे सर्व कार्य सुरळीत पार पाडत होते. तेवढ्यातच न थांबता ग्रामपंचायत चे पूर्ण काम करत पुढील शिक्षन घेत शासकीय नौकरी साठी प्रयत्न करत होते.

अखेर त्याला फलश्रुत म्हणून  18 मार्च 2018 रोजी त्याची आरोग्य विभाग नागपूर येथे शासकीय नौकरी नियुक्त झाली आहे. यावेळी ग्रामपंचायत चे सर्व पधादिकाऱ्यांनी अलोणे यांनी आपल्या कर्तृत्व व जिद्दीनी शासकीय नौकरी मिळवाल्याने समाधान व्यक्त केले. 

आरोग्य विभागात नियुक्त झाला बद्दल अमित अलोणे यांना शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन स्वागत केले यावेळी सरपंच लक्ष्मण कन्नाके, सचिव लाडे ग्रा. पं सदस्य सालय्या कंबलवार. मोनिका टोकला,विमला कुर्री,संजूबाई आत्राम,लिपिक कमलाकर गद्देपकवार,राकेश कुर्री,निलेश गुंडावर तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. 

     

Post a Comment

0 Comments