त्या ग्रामकोष समिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू; सरपंच उमेश कडते आंबटपल्ली ग्रा.प.अंतर्गत तेंदूपत्ता मजुरीचा प्रकार



आंबटपल्ली :- आंबटपली ग्रामपंचात अंतर्गत येत असलेल्या गावातील तेंदू संकलन केलेल्या नागरिकांचा पैसा न मिळाल्यास ग्रामकोश समिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू अशे प्रसिद्धी पत्रकात आंबटपली ग्रामपंचायत सरपंच उमेश कडते यांनी म्हटले आहे सदर प्रसिद्धी पत्रकात अशे म्हटले आहे की आंबटपल्ली ग्रामपंचापत अंतर्गत येत असलेल्या आंबटपल्ली, आंबटपल्ली टोला, चिचेला, येरमेटोला, कोडीगाव, कोडीगाव टोला, फुस्कीमाल या अनुसुचित क्षेत्रातील (पेसा अंतर्गत) तेंदूपाने विक्रीकरिता जाहीर लिलाव पेसा अधिनियम व शासन निर्णय दिनांक १७/१२/२०१५ नुसार स्वतः तेंदूपाने विक्रीचा निर्णय घेतल्याने जाहीर लिलाव दिनांक १८/०३/२०२४ रोजी ग्रा.पं. कार्यालय आंबटपल्ली येथे दुपारी ठीक १२:००वा. घेण्याचे ठरविण्यात आले होते, परंतु लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता लागु असल्याने लिलाव घेण्यात आले नाही.



        आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्रामकोष समिती अध्यक्षांनी ( फुस्कीमाल ग्रामकोष समिती अध्यक्ष वगळुन) तेंदुपत्ता कंत्राटदाराशी संगनमत करून गडचिरोली येथे जाऊन गुप्तमार्गाने २८/११/२०२३ रोजी मे. जोत्सना मोटर्स सावली यांच्या नावाने करारनामा करण्यात आले.

      सदर माहिती या अध्यक्षांनी ग्रामपंचायतीला दिलेली नाही. हा करारनामा देखील चुकीचा आहे. ही चुक आम्ही जनतेसमोर आणुन दिल्यानंतर जनतेनी या अध्यक्षांना विचारले असता जर कंत्राटदार पैसे दिले नाही तर आम्ही आमच्या खिशातून पैसे देऊ असे जनतेला आश्वासन दिले.

     तेंदुपत्ता संकलन सुरु केल्या पासुन ७ दिवसांच्या आत पैसे देण्याचे करारनाम्यात लिहून दिल्यानंतरही तेंदुपत्ता संकलन बंद करून जवळजवळ १५ दिसांचा काळ लोटुनही अजुनपर्यंत जनतेला पैसा मिळालेला नाही. जर जनतेला त्यांच्या मेहनतीचा पैसा मिळाला नाही तर मी आंबटपल्ली ग्रामपंचायत सरपंच या नात्याने या संबंधीत ग्रामकोष समितीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करून जनतेला त्यांचा पैसा व न्याय मिळवून देईन, असे आज उमेश कडते सरपंच ग्रामपंचायत आंबटपल्ली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.

Post a Comment

0 Comments