वंचित बहुजन आघाडीने घेतला समस्यांचा आढावा लाडज वाशियांच्या समस्या पाठवणार शासन दरबारी



ब्रह्मपुरी प्रतिनिधी///अनिल कांबळे

तालुक्यातील अतिसंवेदनशील भागात असलेल्या लाडज या गावच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. लाडज या गावाला संपुर्णपणे नदीने वेढलेले आहे. त्यामुळे ते गाव एका बेटाच्या स्वरूपात आपले जीवनक्रमण करीत आहे. सभोवतील कोणत्याही गावांचा संपर्क या गावाशी येत नाही. त्यामुळे तेथील ग्रामवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तेथील आरोग्य, शिक्षण, किराणा, भाजीपाला, दळणवळण आणि ईतरही दैनंदिन सुविधेतील कामासाठी रात्री बेरात्री बाहेर पडणे खुप कठीण होत आहे.




 शिवाय पावसाळ्यातील चार महिने त्या गावातील जनतेचा तालुक्यातील ईतर गावांशी कुठलाही संपर्क होत नाही. अशा गंभीर स्वरूपाच्या समस्यांना तेथील जनतेला तोंड द्यावे लागत आहे. मात्र त्या गावातील मतदारांच्या भरोशावर आजपर्यंत निवडुन आलेल्या लोक प्रतिनिधी,    आमदार, खासदार, मंत्री यांनी त्या गावातील लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या नाहीत व त्या समस्यांची सोडवणूक सुद्धा केलेली नाही. मागील चाळीस वर्षांपासुन तेथील जनतेची कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी असूनसुद्धा ग्रामवासीयांची दिशाभुल होत आहे. सन 1980-81 च्या काळामध्ये त्या गावाचे तात्पुरते स्थलांतर गांधीनगर या ठिकाणी करण्यात आलेले होते मात्र ग्रामवासीयांच्या सोईचे, त्यांच्या शेतीच्या उत्पन्नाला साजेसे व सर्व भौतिक सुविधांची त्यावेळी पुर्तता करण्यात आलेली नव्हती. तसेच तेथील जनतेचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आलेले नव्हते.  असे स्पष्ट मत गावकऱ्यांनी मांडले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  गावकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेत असतांना तेथील जनतेच्या अनेक समस्या पुढे आल्यात. या अगोदर दोनदा लाडज गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी वंचित आघाडीकडून शासनाला निवेदन देण्यात आले. येत्या चार महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जर शासनाने या गावाचं पुनर्वसन केलं नाही तर समस्यांची गंभीरता लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी तर्फे शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल. या सर्व विषयांवर व समस्यांवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आल्या व त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वंचित आघाडी ग्रामवासीयांसोबत तटस्थ असल्याची ग्वाही देण्यात आली. हि आढावा बैठक गावचे सरपंच मा. भोजराज नंदागवळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी म्हणुन जि सल्लागार डॉ प्रेमलाल मेश्राम, जि आयटी सेल लिलाधर वंजारी, तालुकाध्यक्ष सुखदेव प्रधान, ता उपाध्यक्ष अनिल कांबळे उपस्थित होते. यावेळी लाडज वाशीय जनता मोठया संख्येनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments