सात वर्षांपासून तो गुरुदेव भक्त करतोय वाटसरुसांठी पाणपोईची व्यवस्था




ब्रह्मपुरी  प्रतिनिधी //अनिल कांबळे 


ब्रह्मपुरी;-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील किन्ही गावाजवळील कॅनलजवळ स्वतःच्या आंब्याच्या झाडाखाली

रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना दोन मिनिटं विसावा मिळावा म्हणून किन्ही येथील गुरुदेव भक्त मुखरू प्रधान हे गेल्या सहा-सात वर्षापासून उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांसाठी माठातील थंड पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून समाजसेवेचे व्रत जोपासत आहेत. यामुळे आपल्याला समाधान मिळत असल्याचे ते सांगतात.

   सध्या उन्हाची तीव्रता उन्हाळ्याच्या दिवसात फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची दरवर्षीच ब्रह्मपुरी तालुक्याचे तापमान जवळपास 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतो. त्यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना एक दोन किलोमीटर अंतर गाठल्यावर पाणी पिल्याशिवाय गत्यंतरच नसते. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात थोडासा विसावा मिळावा म्हणून किन्ही येथील गुरुदेव भक्त मुखरू प्रधान हे दरवर्षी आरमोरी ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग लगत लागून असलेल्या त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली दरवर्षी पानपोई लावतात. त्यासाठी दिवसभर ते नागरिकांसाठी माठातील थंड पाण्याची व्यवस्था  करीत आहेत त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना दोन मिनिट आराम आणि थंड पाणी सुद्धा मिळत असल्याने नागरिक  समाधान व्यक्त करीत आहेत

Post a Comment

0 Comments