उपजिल्हाप्रतिनिधी// सिद्धार्थ दुर्गे
गोमनी;-गोमनी येथील ग्रापंचायतीत सन २०१९-२०मध्ये मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परीवर्तन अभियाना अंतर्गत लाखो रुपये खर्च करून आरो प्लांट उभारण्यात आले परंतु गेली४-५वर्षे लोटूनही अजून पर्यंत ग्रामस्थांना आरोच्या पिण्याच्या पाण्याची सोय पुरविण्यात आलेली नाही .
आरोचे पाणी हे शुद्ध जल असते व सगळीकडे आरोच्या पाण्याची मागणी आहे म्हणून शासन सर्वसाधरण जनतेला शुद्ध जल मिळवून देण्यास अनेक योजना राबवित प्रयत्न करत असते, पण आरोचे पाणी अजूनही मिळत नसल्याने
खाजगी आरो प्लांटच्या विक्रेत्या कडून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामस्थांना गोमनी येथिल आरो प्लांट योजनेचा फायदा काय?पुन्हा किती वर्षे खाजगी आरो प्लांट मधून पाणी विकत घ्यावे लागणार आहे?
असे अनेक प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे, या विषयी संबंधीत अधिकाऱ्यांनी सक्तीने लक्ष देऊन आरो प्लांट सुरू करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे
0 Comments