गोमनी परिसरातील अवैध रेती चोरीवर आळा घाला:अन्यथा आंदोलन;सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे




विभागीय संपादक // मारोती कोलावार


गोमनी;-तालुक्यातील गोमनी परिसरातील अवैध रेतीच्या चोरीवर आळा घाला अन्यथा दिनांक 16/05/2024 ला वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आज दिनांक 11/5/2024 रोजी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.


सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की मूलचेरा तालुक्यातील गोमनी परिसरात गोमनी,आंबटपल्ली व गोविंदपूर या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या तीनही ग्रामपंचायती मार्फत विविध विकासकामे चालू आहेत.

सदर जिल्ह्यात अजून पर्यंत एकही रेती घाटाचे लिलाव झाले नाही कुठेतरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंत्राटदार साठगाठ करून रेतीचोरी जोमात करीत आहेत.

असे कंत्राटदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगमत केल्याने शासनाच्या महसुलाला कोट्यावधी रुपयांचा चुना लागत आहे.

अश्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने नियमित कारवाही करावी व तात्काळ निलंबित करून ज्या ठिकाणी अवैध उत्खनन व विकास कामे झाले त्या ठिकाणांची चौकशी करून मोका पंचनामा करावा व संपूर्ण अवैध उत्खनन झाले आहे, यास अधिकारी,कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्या पगारातून झालेल्या उत्खननाचा दंड वसूल करावा अन्यथा दिनांक 16/05/2024 रोजी वन परिक्षेत्र कार्यालय गोमणी समोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे. 



Post a Comment

0 Comments