ब्रम्हपुरी तालुक्यातील 121 रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीन चे वाटप




ब्रह्मपुरी प्रतिनिधी //अनिल कांबळे.       

ब्रम्हपुरी;-सार्वजनिक वितरण प्रणालीत ई-पॉस मशीन चे महत्व मागील काही वर्षात अनन्य साधारण आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राशन वितरण प्रणाली पारदर्शकता ही ई-पॉस मशीन मुळे शक्य झाले आहे. 2016 मध्ये दिलेल्या मशीनमध्ये कालांतराने अद्यावत करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदर मशीन मध्ये 4G नेटवर्क असून त्यामध्ये जिओ व व्हि आय कंपनी चे सिम आहे सोबत ज्यांचे अंगठे लागत नाही त्यांच्या करिता डोळे स्कॅनर सुद्धा देण्यात आले आहे अशा अद्यावत ई-पॉस मशीन दि.31 मे 2024 रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील 121 रास्त भाव दुकानदारांना तहसीलदार श्रीमती उषा चौधरी व अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे यांच्या मार्फत वाटप करण्यात आले. नवीन ई-पॉस  मशीनद्वारे गतिशील नेटवर्कने लाभार्थ्यांना धान्य वितरण करणे आणखी गतिशील होणार आहे व ज्या वयोवृध्द लाभार्थीचे अंगठे लागत नाही त्यांना सुद्धा डोळे स्कॅन करून धान्य मिळेल. रास्त भाव दुकानदारांना नवीन ई-पॉस मशीनचे वितरण करताना तहसीलदार उषा चौधरी, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे पुरवठा विभागाचे सपन गड्डमवार, दिलीप मेश्राम, दशरथ फुलझेले तसेच इट्रेगा कंपनीचे रोशन मडावी, सागर अगडे, अविनाश गणवीर व इतर कर्मचारी आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते ‌.

Post a Comment

0 Comments