महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले यांनी शंभर टक्के निकाल लावून इतिहास रचला

 ब्रह्मपुरी प्रतिनिधी//अनिल कांबळे 




विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने अभिनंदन सोहळा पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी श्री सुरेश दुनेदार सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव भोसले ,श्री हेमराज कांबळी माजी उपसरपंच, श्री दादाजी कांबळे पालक, श्री निलकंठ देशमुख पालक ,ज्येष्ठ शिक्षक श्री मस्के सर, श्री पुरी सर, कुमारी अंशुल राऊत मॅडम यांचे उपस्थितीमध्ये गुणवंतांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .विद्यालयामध्ये एकूण 75 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 25 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये 35 विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीमध्ये 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . विद्यालयातून प्रथम कुमारी सानिया हेमराज कांबळी 86.60%, द्वितीय निलेश अतुल धोटे 84.20% तृतीय कुमारी उज्वला नीलकंठ देशमुख 83.60%,कुमारी चैताली दीपक इंदूरकर 82.80%,वैष्णवी शेषराज ठाकरे 82.40%, साहिल रवी मैंद 82.20% पूर्वा हिवराज नंदेश्वर 81.80%, निकीता लोमेश बन्सोड 80.60% रणवीर सुधीर गायधने 80.40%,पायल विनोद ठाकरे 80%, क्रिश विनोद शेंडे 80 %गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री पुरी सर यांनी केले. कार्यक्रमाला पालक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments