#khabrdarmaharashtr#onlinenewsportal#social#education#political#entertainment#crime
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड बौद्ध समाजाची निवेदनातून मागणी
आष्टी: चामोर्शी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात सर्रास देशी दारु, इंग्लीश दारु, मोहफुलाची दारु विक्री केल्या जात आहे. तसेच बोद्ध विहाराच्या मागे आणि पुढे दारु विक्री जोमात चालु आहे आणि बौद्ध विहाराच्या आवारात दारुचा बाटला पडुन राहतात. आणि वंदनेसाठी गेलेल्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बाहेरगावचे लोक आणि इतर वार्डाचे दारु पिण्याकरिता लोक या वार्डात येतात आणि दारु पिणाऱ्या व्यक्तीकडून अतिशय त्रास होत आहे.
आणि दारु पिऊन वार्डामध्ये दारु प्राशन करून अश्लिल शब्दात शिवीगाळ करित असतात दारु पिऊन पडुन राहत असल्याने वार्डातील लोकांना दारु विक्रेत्यांकडुन त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वार्डातील अवैद्य दारु विक्री थांबविण्याची विनंती चामोर्शी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डातील त्रस्त
महिला व पुरुषांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी केली आहे गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असताना देशी विदेशी दारू येते कुठून आणि अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांना निवेदन देऊन मागणी करण्याची वेळ येत आहे तर संबंधित विभाग अवैध दारू विक्रेत्यांना पाठिशी घालत आहे का? असा सवाल तालुक्यातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे
0 Comments