काँग्रेसचे उमेदवार निवळून आणणारे आम्ही भाडोत्री आहोत काय;माजी आमदाराचा सवाल डॉ किरसान यांचा विजय म्हणजे एकट्या काँग्रेसचा विजय नाही




जिल्ह्यातील पदाधिकर्यांनो तोंडाला आवरा



गडचिरोल्ली;- नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोणी पार पडली असून, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार श्री नामदेवराव कीरसान हे एक लक्ष 31 हजार या बहुमूल्य मताने विजयी झाले. मात्र निवडणुकीत घवघवीत यश मिळविण्या करीता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे शिवसेना गट मिळून महविकास आघाळी निर्माण करून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर नामदेव कीरसान यांना उमेदवारी देण्यात आली . या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्र येऊन, संघटित प्रचार करून , तन मन धनाने, मिळून, काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसाण यांना विजय मिळवून देण्यात पूर्णतः स्वतःला झोकून दिले. त्यामुळेच डॉक्टर नामदेव किरसान यांचा झालेला विजय हा एकट्या काँग्रेस पक्षाचा विजय नसून हा संपूर्ण महाविकास आघाडीशी  जुळलेल्या सर्वच पक्षाचा विजय आहे. परंतु काँग्रेसचे उमेदवार अधिक मताधिक्याने विजयी झाले याचे अविर्भाव की काय,  काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख  पदाधिकाऱ्याकडून आपण तीनही विधानसभा लढवीनार असल्याचे बोलले जात असल्याने आम्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणारे भाडोत्री आहोत काय ? असा सवाल उबाठा शिवसेना गटाचे माजी आमदार रामकृष्ण मडावी व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहे.

        पुढे बोलताना रामकृष्ण मडावी म्हणाले की आमचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी सुचविल्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या संघटनात्मक विचाराचा एकत्रीकरण करून आपण सर्व एकत्र होऊन काँग्रेस चे  उमेदवार डॉक्टर किरसान यांना निवडणुकीत पुरेपूर मदत करायची आहे. पक्ष प्रमुखाने दिलेल्या आदेशाचा आपण पालन केलेला असून मात्र काँग्रेस पक्षातर्फे महविकास आघाडीच्या  संघटनात्मक विचारला बाजूला सारून येऊ घालणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अहेरी आरमोरी व गडचिरोली ही तीनही विधानसभा क्षेत्रात आपण काँग्रेसचेच उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याकडून बोलले जात आहे. हे अतिशय खेदपूर्न असून महविकास आघाडीतील  इतर पक्षाला डिवचनारे असून इतर पक्षावर अन्याय करणार आहे 

         पुढे रामकृष्ण मडावी म्हणाले की , आपण शिवसेना पक्षा तर्फे दोनदा निवडून येऊन आमदार राहिलो आहे . मी पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता असून देखील इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना पक्ष सोडून गेले.  मात्र मी एकनिष्ठ शिवसैनिक असून अजूनही शिवसेना पक्ष्यात आहे.  येऊ घालणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण शेवसेना पक्षतर्फे लढत लढनार असून पक्षाने माझ्यावर अन्याय केल्यास आपण अपक्ष लढणार असल्याचेही डॉ. रामकृष्ण मडावी यांनी स्पष्ठ सांगितले. काँग्रेस पक्षातील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या बळबोलण्यावर आवर घालावा अन्यथा शिवसेना स्टाईल समजाविण्यात येणार असल्याचेही माजी आमदार डॉ . रामकृष्ण मडावी यांनी सांगितले.

         यावेळी डॉ. रामकृष्ण मडावी, कल्पनाताई तिजारे, अक्षय बोरकर, रामदास दहिकर , सुनील बांग्रे, रिंकू झरकर, मीनाक्षी मारभते, विद्या मेश्राम

Post a Comment

0 Comments