दोन महिण्यांपासुन अख्खा भिमनगर गाव अंधारात! दलित वस्तीकडे ग्रामपंचायत आंबटपल्लीचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष...




विभागीय संपादक // मारोती कोलावार

आंबटपल्ली: ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भिमनगर मागील २ महिन्यांपासुन गावातील एकाही खांबाला बल्ब नाही. या संबंधिची माहिती वार्ड सदस्य व सरपंच यांना दिल्यानंतरही अख्खा भिमनगर गाव हा अंधारातच आहे.

          भिमनगर हे गावं दलित वस्तीचे असल्याने आंबटपल्ली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करित असल्याचे विदारक चित्र दिसुन येत आहे. दलित वस्तीच्या नावाने LED बल्ब खरेदी करीता निधी उपलब्ध होत असतो आणि आलेली संपूर्ण निधी उचल करून LED बल्ब खरेदी केल्याचे दाखविले जाते मात्र प्रत्यक्षात खांबाला बल्ब वर्षाला जेमतेम एक ते दोन वेळा लावण्यात येते




         भिमनगर गावात जेमतेम एकूण १० बल्ब लागतात. हे १० बल्ब देखील लावण्या करिता २ महिन्याचा कालावधी लागत असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे. वारंवार सांगुनही लावण्यात येत नाही आहे याचाच सरळ सरळ अर्थ असा होतो की दलित बहुजन समाजाकडे अधिकारी व कर्मचारी हे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसुन येत आहे. अधिकारी व कर्मचारीच जर बहुजन समाजासोबत दुजाभाव करीत असेल तर बहुजन समाज दाद मागायचीच तर कुणाकडे?

      हल्ली पावसाळा सुरु झालेला आहे या दिवसात मोठ्या प्रमाणात विषारी-बिन विषारी साप, विंचू व लहान मोठे किटक परिसरात निघत असतात अशा वेळेत अख्खा गावच जर अंधारात असेल तर अशा प्राण्यां पासुन व किटकांपासुन जीवितहाणी नाकारता येत नाही.

         अखेर भिमनगरमध्ये बल्ब कधी लागतील? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. या पावसाळ्याच्या दिवसात बल्ब लागतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




बाक्स


माझ्याकडे बल्ब दिलेले आहेत परंतु होल्डर आणि वायर अजुनही दिले नाही व बल्ब लावणाऱ्या व्यक्तीची मजुरी देखील दिले नसल्याने मी बल्ब लावले नाही.

            सौ. रुपाली रोशन गोडबोले

            ग्रा.पं. सदस्या आंबटपल्ली

Post a Comment

0 Comments