ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी : -अनिल कांबळे
स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात एन सी सी आणि शारीरिक शिक्षण विभागातर्फे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन
साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे तसेच संस्थेच्या सदस्य आणि महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ स्निग्धा कांबळे ,पतंजली योग समिती ब्रम्हपुरीचे योगाचार्य
पालघर,असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्ट. सरोज शिंगाडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. श्री. बुरखंडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या
...... अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.देवेश कांबळे ,प्रमुखअतिथी डॉ स्निग्धा कांबळे,योगाचार्य श्री .पालघर, एन सी सी विभाग प्रमुख लेप्ट प्रा.सरोज शिंगाडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. बुरखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन कार्यक्रमास सकाळी ६ वाजता सुरुवात करण्यात आली.पतंजली योग समितीचे भगवान पालकर आणि त्यांच्या टीमचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग प्राणायाम यांचे महत्व समजावून दिले.
एन सी सी विभाग प्रमुख लेप्ट. सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनात एन सी सी गर्ल्स युनिट च्या ५० केडेट्स नी सहभाग नोंदविला.तर शारीरिक शिक्षण विभाग आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी य
सहभाग घेतला.पतंजली योग समितीचे पदाधिकारी तसेच प्रशिक्षक यांनी योग,व्यायाम प्राणायाम करून घेतले.योग, व्यायाम व प्राणायाम यावर योग सादर केले. सदर कार्यक्रम सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन सी सी विभाग शारीरिक शिक्षण विभाग आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments