एटापल्ली;- वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगल परिसरात नदी मध्ये मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन झालेले आहे, यास जबाबदार वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा दिनांक.27/06/2024 पासुन मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलन करण्यात येत असल्याबाबत.असल्याचे सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
सविस्त या प्रमाणे की वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगलव्याप्त परिसरात नदी असून मागील काही महिन्यापासून या नदी पात्रातून अंदाजे15,ते 20 हजार ब्रास रेतीची अवैधरित्या चोरी, सुरजागड उतखनन करणारी कंपनी रेतीची खुलेआम चोरी करीतआहेत, वनरक्षक,वनपाल, वनपरीक्षेत्रअधिकारी, सहाय्यक उपवनसंरक्षक, उपवनसंरक्षक हे बघ्याची भूमिका घेतात.
पगार शासनाचा घेतात, चुना शासनालाच लावतात. करोडो रुपयाची अवैध रित्या रेतीची चोरी वनविभागाच्या अधिकारी यांच्या संगणमतानेच झालेली आहे,यात वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी देवाण -घेवाण करून हजारो ब्रास रेती उपसा करू दिल्याचे दिसून येत आहे.
एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयं अंतर्गत येत असलेल्या अधिकाऱ्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते, त्यामुळें यास सर्व जबाबदार वनरक्षक, वनपाल वनपरीक्षेत्र अधिकारी सहाय्यक वन संरक्षक व उप वन संरक्षक यांचे कडून अवैध रेती उत्तखंनंन ची रक्कम या सर्वांच्या सेवा पुस्तकात नोंद करून पगारातून वसुल करावेत व या सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,
महसूल विभागाच्या रेट नुसार ५ पट दंड आकारून संबंधित कंत्राटदार यांचे कडून तात्काळ रक्कम वसूल करण्यात यावे, या मागणी साठी दिनांक.27/06/2024 पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे याची संपुर्ण जबाबदारी वन विभागाची राहिल.अशी भूमिका आहे
आमच्या प्रतिनिधींनी वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांना संपर्क करून त्यांची बाजू ऐकण्याचे प्रयत्न केले त्यांच्या कडून स्पष्टीकरण विचारले असता आम्ही चौकशी केली चौकशी दरम्यान रेती कोणी उचल केली हे। स्पष्ट झाले नाही म्हणून आम्ही लावारीस पीआर केला सदर असे ऐकून त्यावेळेस आम्ही अहवाल मागण्याचा प्रयत्न केला परंतु वनपरिक्षेत्र अधीकारी नीलिमा खोब्रागडे यांनी अहवाल देण्यास टाळाटाळ केले आहे
0 Comments