तुम्ही करा उत्खनन मी बसतो आंदोलनाला वनविभागाच्या नाकी दम करणारा कार्यकर्ता म्हणजे कुडवे






एटापल्ली;- सध्या स्थितीत वनविभाग मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्त्यांच्या टार्गेटवर दिसून येत आहे

तुम्ही करा अवैध उत्खनन मी बसतो आंदोलनाला अशी भूमिका  आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी घेतली आहे असाच प्रकार वनपरिक्षेत्र अंतर्गत बांडे झारेवाडा या जंगलपरिसरातील नदीतून सुरजागड उत्खनन करणारी कॅंपनी अवैधरित्या रेती चोरी करीत आहे अशे आरोप योगाजी कुडवे यांनी केले व त्या बेजवाबदार वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित करा अन्यथा येत्या 27 जून ला मुख्य वनसंरक्षक वनवृत कार्यालय गडचिरोल्ली समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 


त्या विषयाला अनुसरून आज दिनांक 27/6/2024 रोजी गुरुवार ला कार्यालयासमोर आंदोलनाला योगाजी कुडवे आपल्या कार्यकर्तासोबत बसले या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा आहे की वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगलव्याप्त परिसरात नदी असून  मागील काही महिन्यापासून या नदी पात्रातून अंदाजे हजारो ब्रास रेतीची अवैधरित्या चोरी,  सुरजागड उतखनन करणारी कंपनी रेतीची खुलेआम चोरी करीत होती तरीसुद्धा वनरक्षक,वनपाल, वनपरीक्षेत्रअधिकारी, हे बघ्याची भूमिका घेतात.   

      पगार शासनाचा घेतात, चुना शासनालाच लावतात. करोडो रुपयाची अवैध रित्या रेतीची  चोरी वनविभागाच्या अधिकारी यांच्या संगणमतानेच झालेली  आहे,यात वन विभागातील  अधिकारी कर्मचारी यांनी देवाण -घेवाण करून हजारो ब्रास रेती  उपसा  करू  दिल्याचे दिसून येत आहे.


एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयं अंतर्गत येत असलेल्या अधिकाऱ्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते, त्यामुळें यास सर्व जबाबदार वनरक्षक, वनपाल  वन परीक्षेत्र अधिकारी  एटापल्ली यांचे कडून अवैध रेती उत्तखंनंन ची रक्कम या सर्वांच्या सेवा पुस्तकात  नोंद करून  पगारातून वसुल  करावेत व या सर्व जबाबदार अधिकारी,  कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, 

महसूल विभागाच्या रेट नुसार ५ पट दंड आकारून संबंधित कंत्राटदार यांचे कडून तात्काळ रक्कम वसूल करण्यात यावे अशी भूमिका घेतली आहे या वेळी आंदोलनाला योगाजी कुडवे, रवींद्र सेलोटे, जितेंद्र जांभुळकर, मधुकर रेवाडे उपस्तीत होते


विशेष

योगाजी कुडवे अनेक प्रकरण उघडीस आणून शासनाला लाखो रुपयांचा बुळता महसूल मिळवून दिला तरी कुठे ना कुठे कंत्राटदार व वनकर्मचारी साठगाठ करून उत्खनन करवून घेतात व शासनाला चुना लावण्यास व कंत्राटदाराला मालामाल करण्यास मदत करतात अशे कुठपर्यंत चालणार हे भ्रस्ट काम कधी बंद होणार असा सवाल पडला आहे 


तुम्ही करा अवैध उत्खनन मी बसतो आंदोलना अशी भूमिका योगाजी कुडवे यांनी घेतली आहे वनविभागाच्या नाकी दम करणारा कार्यकर्ता म्हणजे योगाजी कुडवे अशे नागरिकांत बोलले जात आहे

Post a Comment

0 Comments