कोडसेलगुडम येथे सार्वजनिक विवाह सोहळा संपन्न




       राहुल दोंतुलवार //ग्रामीण प्रतिनिधी देवलमरी 

अहेरी: तालुक्यातील कमलापुर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या *मौजा -  कोडसेलगुडम* येथे *मंत्री, ना. धर्मराव बाबा आत्राम* यांच्यातर्फे दिनांक  ०९/०६/२०२४ रोज रविवार ला  सकाळी ठीक ११.३० वाजता सामुहिक विवाह सोहळ्याचे कार्यक्रम संपन्न झाले.या विवाह सोहळ्यात एकूण १०जोडप्यांचा सहभाग होता.

      सदर सामुहिक विवाह सोहळ्यात माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री ताई हलगेकर (आत्राम),  माजी पंचायत समिती सदस्य  हर्षवर्धन बाबा आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर सामुहिक विवाह कार्यक्रमात बाबुराव तोर्रेम सामाजिक कार्यकर्ते ,सांमया करपेत सामाजिक कार्यकर्ते , मंताय्या आत्राम सामाजिक कार्यकर्ते   बालाजी गावडे  माजी सरपंच येरमनार ,  विनायक आलाम  माजी सरपंच तथा ग्रा.पं.सदस्य राजाराम (खां ),तिरुपती मडावी माजी ग्रा.पं सदस्य इंदाराम आणि कमलापुर परिसरातील सर्व आदिवासी बांधव व इतर सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून वधू -वरास आशीर्वाद देऊन, त्यांच्या पुढील सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या.


      


Post a Comment

0 Comments