गडचिरोल्ली;-मूलचेरा तालुक्यातील मुखडी उपक्षेत्रात वनविभागाच्या नाल्यातून हजारो ब्रास रेती उपसा 2)एटापल्ली वनपरिक्षेत्रामध्ये वनजमिनीतून अवैध प्रकारे उत्खनन 3) वनपरिक्षेत्र धानोरा अंतर्गत रंगी जांभडी ते दवंडी या रस्ताबांधकामात वनजमिनीतून मोठया प्रमाणात मुरूम मातीचे उत्खनन
या मुद्द्यातील पुरावे सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी वरिष्ठांना सादर केले व संबंधित कंत्राटदार व अभय देणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून योग्य ती कारावहीचे निवेदन वारंवार देऊनही कारवाही न झाली असता आज दिनांक 11/6/2024 रोजी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला व मुख्यवनसरक्षक कार्यालयासमोर बेमुद्दत ठिया आंदोलन मांडला जेव्हा पर्यंत वरील क्षेत्रांतील कंत्राटदार व वनकर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई होत नाही तीत पर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा योगाजी कुडवे यांनी दिला आहे
प्रमुख मागण्या
1) पेडीगुडम वनपरिक्षेत्र अंतर्ग मुखळी उपक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगलातील नाल्यामधून अवैद्य रेती उपसा झालेले असून यास जबाबदार वनरक्षक, वनपाल यांना तात्काळ निलंबीत करा.
2) वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या कारमपल्ली फाटा ते ताडपल्ली तसेच दोड्डी ते तांबळा या रस्ता बांधकाम करीता कंत्राटदाराने साईड बम करीता जंगलातील माती व मुरुमाचे अवैध उत्खनन करुन रस्त्याकरीता वापरण्यात आले असून याकडे वनपाल, वनरक्षक यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना निलंबीत करा. तसेच खोटा चौकशी अहवाल सादर करणाऱ्या अधिकारी यांना निलंबीत करा.
3) धानोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत रांगी ते जांभळी ते दवंडी या रस्ता बांधकाम करीता कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही कडेला जेसीबी च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे. तसेच जंगलात सुद्धा हजारो ब्रासचे उत्खनन केले आहे. त्यामुळे यास सर्व जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना निलंबीत करा. 4) तिन्ही कामांच्या कंत्राटदारांवर वनगुन्हे दाखल करा व झालेल्या उत्खननाची 5 पट दंड वसूल करा.
0 Comments