विभागीय संपादक//मारोती कोलावार
आंबटपल्ली:दिनांक 11/6/2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालय आंबटपल्ली येथे तेंदुपत्ता संकलनाच्या मजुरी संदर्भात ग्रामसभा घेण्यात आले. या ग्रामसभेत आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आंबटपल्ली,आंबटपल्ली टोला, चिचेला, येरमेटोला, कोडीगाव, कोडीगाव टोला, फुस्कीमाल या गावातील सन २०२३- २०२४ तेंदुपत्ता संकलन करून एक महिण्याचा कालावधी लोटूनही नागरीकांना मजुरी मिळाली नाही याकरिता ग्रामसभा घेण्यात आले. या ग्रामसभेत सबंधित गावातील ग्रामकोष समिती अध्यक्षांना देखील बोलविण्यात आले आणि संबंधित अध्यक्षांना तुम्ही सर्वांनी गुप्तमार्गाने गडचिरोली ला जाऊन करारनामा केलात त्यावर तुम्ही चक्क सरपंचांची खोटी स्वाक्षरी करून पैसे घेऊन करारनामा केलात तर आज तेंदुपत्ता संकलन करून एक महीण्याचा कालावधी लोटूनही नागरीकांची मजुरी का बर मिळाले नाही, असे सरपंच उमेश कडते यांनी व सभेतील लोकांनी मजुरी कधी असे विचारले असता आंबटपल्ली येथील ग्रामकोष समिती अध्यक्ष गणेश आत्राम करारनाम्याची प्रत घेऊन येतो असे सांगुन सभेतून फरार झाला तर चिचेला येथील ग्रामकोष समिती अध्यक्ष राकेश सडमेक हा गणेश ला बोलावून आणतो म्हणून तो देखील फरार झाला तर हे दोघेही परत सभेत आलेच नाही आणि सभा बर्खास्त झाली.
अखरे तेंदुपत्ता मजुरीचा प्रश्न सुटता सुटेना...
0 Comments