मुखडीटोला (मच्छली) गावालागतच्या नाल्यावरील बंधारा बांधकामात कंत्राटदाराने शासनाची केली शुद्ध लूट हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वापर





गोमनी:- मूलचेरा तालुक्यातील गोमनी परिसरातील मच्छली गावालगत असलेल्या नाल्यावर बंधाऱ्यांचे काम चालू आहे. त्या बंधाऱ्याच्या कामात  कंत्राटदाराने त्याच नाल्याची रेती उपसून तिथेच उपयोग केल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे.


चक्क त्या कंत्राटदाराची कमालच आहे हजारो ब्रास रेती त्याने त्याच नाल्यातून उपसा करून अवैधरित्या जमा करून ठेवली आहे.



     गोमनी येथे वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय आहे आणि तिथून काही अंतरावर बंधाऱ्याचे काम चालू आहे. या संबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती असूनही आजपर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही संबंधित कंत्राटदारावर  करण्यात आली नाही, यावरून असे लक्षात येते की कंत्राटदार व संबंधित अधिकारी,कर्मचारी यांच्या संगनमतानेच या बंधाऱ्याचे काम जोमात सुरु असल्याचे दिसुन येत आहे.

        रक्षकच भक्षक बनले... तर अशा रेती चोरीवर आळा घालणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments