येथील नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ येथील परिसरात अवैध दारू विक्री होत असंताना महिलांनी पोलीसात तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक विश्वास पूल्लरवार यांनी अवैध दारू निर्मूलनासाठी एक विशेष पथक नेमून सलग दोन तीन दिवस अवैध दारू विक्री करणारांवर बारीक नजर ठेवली होती त्यामुळे आता दारू विक्री पुर्ण बंद झाली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ परिसरातील महिलांनी सोमवारी १७ जून रोजी रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिस निरीक्षक विश्वास पूल्लरवार यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चामोर्शी शहरातील प्रभाग क्रमांक ८ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत होती. या अवैध दारू विक्रीमुळे या परिसरातील महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ येथील महिलांनी पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. शहरातील अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस निरीक्षक विश्वास पूल्लरवार यांनी अवैध दारू निर्मूलनासाठी एक विशेष पथक नेमणूक मोहीम आखली होती. सलग दोन तीन दिवस पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसरातील अवैध दारू विक्री पूर्णतः बंद झाली असून तक्रारदार महिलांच्या तक्रारीवर कारवाई झाल्याने सोमवारी १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांनी पोलिस निरीक्षक विश्वास पूल्लरवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि आभार मानले
0 Comments