आंबटपल्ली:- ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आंबटपल्ली, आंबटपल्ली टोला, चिचेला, येरमेटोला,कोडीगाव, कोडीगाव टोला, (फुस्कीमाल वगळुन ) या पेसाअंतर्गत येणाऱ्या गावांतील ग्रामकोष समिती अध्यक्षांच्या चुकीच्या करारनाम्यामुळे तेंदुपत्ता संकलन सुरु करून अवघ्या ३ दिवसात संकलन बंद करण्यात आले. या गाष्टीला आज एक ते दीड महिना पूर्ण झालेला आहे तरीही मजुरी मिळालेली नाही. या किळसवाण्या प्रकाराला हे ग्रामकोष समिती अध्यक्षच पुर्णपणे जबाबदार आहेत.
हा सर्व एक ते दीड महिन्यापासुन सुरु असलेला किळसवाना प्रकार पाहुन गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असुन यंदाची मजुरी मिळेल कि नाही? असा प्रश्न निमार्ण झाल्याने जिकडे तिकडे तेंदुपत्ता मजुरीचीच चर्चा होताना दिसत आहे.
या चर्चेचा मुख्य विषय सध्या ग्रामकोष समिती अध्यक्ष आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर योग्य ती कार्यवाही होऊन नागरीकांना न्याय मिळेल काय हाच आहे.
असा तेंदूपत्ता कंत्राटदार व ग्रामकोश समिती अध्यक्षांची बॉडी पुन्हा आम्हाला नको
स्वतःच्या स्वार्थापोटी गरीब जनतेच्या पोटावरती लात मारणारा तेंदूपत्ता कंत्राटदार व ग्रामकोश समिती अध्यक्ष पुन्हा नको बनला चर्चेचा विषय
आंबटपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या भागात बहुतांश परिवार हे शेतीवर अवलंबून आहेत ग्रामकोश समिती आध्यक्षांच्या चुकीमुळे संपूर्ण आंबटपली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावांना दशा भोगावे लागत आहे तेंदूपत्ता तोळाईतून शेतकरी हा शेतीचा निश्चित नियम बनवितो परंतु या वर्षी तोडाईचा टार्गेट ही अपूर्ण राहिला व मजुरीही मिळाली नाही या मुळे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे पोटाची भाकर हिरावणारा कंत्राटदार व गावकऱ्यांची फसवणूक करणारी ग्रामकोश समिती अध्यक्षांची बॉडी आम्हाला नको अशी चर्चा परिसरात चालू आहे
0 Comments