आंबटपल्ली;-आंबटपल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत तेंदूपत्ता तोडाईच्या मजूची प्रश्न आता सुटतांना दिसून येत आहे चक्क सरपंचाणी आमसभा बोलावून त्या आमसभेत सर्वानुमते तेंदूपत्ता विक्रीबाबत ठराव पारित झाला आहे यात जनतेची फसवणूकिचा कंत्राटदाराचा डाव फसतांना दिसून आला आहे
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आंबटपल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत या वर्षी तेंदूपत्ता तोडण्यासंधर्भात छुप्या मार्गाने कारारनाम कंत्राटदाराने करवून घेतला ही बाब काही जनप्रतिनिधींनी नागरिकांच्या लक्षात आणून दिली जशे तशे तेंदूपत्ता तोडाईला सुरुवात झाली व अवघ्या तीन दिवसात कारणे दाखवून कंत्राटदाराने अर्ध्यातच तेंदूपत्ता तोडन्यास मनाई केली व आज जवळ जवळ दीड महिन्यापासून तेंदूपत्ता तोडाईचा पैसा देण्यास कंत्राटदार फिरवा फिरवीचे उत्तर देत असल्या कारणाने चक्क सरपंचाने आंबटपल्ली ग्रामपंचायतीमध्ये आमसभा बोलावून या समस्यांचे निराकरण करण्यास नागरिकांना विचारणा केली या आमसभेत कोडीगाव, कोडीगाव टोला,चिंचेला येथील नागरिक उपस्तीत होते यात नागरिकांनी सर्वानुमते दुसऱ्या कंत्राटदाराला तेंदूपत्ता विकण्यास उपाय सुचविला व सर्वानुमते ठराव पारित करण्यात आले अश्याणे आता कुठेतरी नागरिकांना तेंदूपत्ता मजुरी मिळेल हे विश्वास झाले आहे
0 Comments