जहाला माओवादी गिरीधर व त्याची पत्नी ललिता (डिव्हीसी भामरागड दलम) यांनी केले आत्मसमर्पण







                                                      


गडचिरोली;-जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम, गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, सब मिलिटरी कमिशनचा सदस्य, वेस्टर्न सब-झोनल कमांडर इन चिफ तसेच कंपनी नं. 10 चा इन्चार्ज गिरीधर तुमरेटी आणि त्यांची पत्नी ललीता (डिव्हीसी भामरागड दलम) यांनी केले मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण.

आत्मसमर्पित माओवादी यांचा मेळाव्यात उपस्थित राहता माओवादी कुटूंबातील सदस्यांसोबत मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. यांनी साधला संवाद

मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या हस्ते पार पडला सिटीसी किटाळी येथील कॉन्फरन्स हॉल व महिला पोलीस अंमलदार बॅरेक उद्घाटन समारंभ

माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) व सी-60 जवानांचा केला सत्कार


महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. देवेंद्र फडणवीस यांचा आज दिनांक 22/06/2024 रोजी गडचिरोली जिल्हा दौरा पार पडला. शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 664 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 22/06/2024 रोजी वरिष्ठ जहाल माओवादी नामे नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्च्ु, (गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी), वय 44 वर्ष, रा. जवेली खुर्द, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली याने त्याची पत्नी संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडी, (डिव्हीसीएम, भामरागड दलम) वय 39 वर्षे, रा. धोबेगुडा तह. एटापल्ली जि. गडचिरोली सह मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दीनटोला चकमकीनंतर माओवाद्यांची मोठ¬ा प्रमाणात जिवित हाणी झाल्यामुळे उत्तर आणि दक्षिण विभागाचे विलीनीकरण होऊन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळीची जबाबदारी गिरीधरकडे सोपविण्यात आली होती. त्यामुळे गिरीधरच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली आणि संपूर्ण मध्य भारतातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे. 

यावेळी आयोजीत कार्यक्रमादरम्यान मा. उपमुख्यमंत्री यांनी मौजा कतरंगट्टा व मौजा मुद्दुमुडगू जंगल परिसरात झालेल्या दोन चकमकीमध्ये 03 डिव्हिसीएम माओवाद्यांसह एकुण 07 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त करुन माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणा­या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देवुन सत्कार केला.  यासोबतच मौजा कतरंगट्टा चकमकीचे नेतृत्व करणारे मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, भा.पो.से. यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या महिला माओवादी नामे रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिला मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 4.50 लाख रुपयाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आत्मसमर्पित कुटूंबातील गडचिरोली येथे उच्च शिक्षण घेणा­या मुलीला टॅब तसेच माओवाद्यांच्या कुटंुबातील सदस्यांना सायकल, स्प्रेपंप व शिलाईल मशिनचे वाटप करुन आत्मसमर्पित माओवाद्यांच्या कुटंुबियांशी मा. उपमुख्यमंत्री यांनी संवाद साधला व त्यानंतर गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 चा आढावा घेतला आणि त्यांनी गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येणा­या माओवादविरोधी अभियान कार्याचे तसेच नागरीकृती उपक्रमाद्वारे जिल्ह्रातील अतिदुर्गम भागात राहणा­या आदिवासी बांधवाच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या कामाबद्दल कौतुक केले.  त्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माओवाद्यांनी हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जिवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन केले.


त्यानंतर मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सिटीसी किटाळी येथे भेट देऊन प्रशिक्षण व माओवादविरोधी अभियानाबातचा आढावा घेतला व त्यांच्या हस्ते सिटीसी किटाळी येथील कॉन्फरन्स हॉल व महिला पोलीस अंमलदार बॅरेकचा उद्घाटन समारंभ पार पाडला. उद्घाटनानंतर सिटीसी किटाळी येथील कमांडो यांनी मा. उपमुख्यमंत्री यांना रात्रीच्या वेळी होणा­या अभियानातील क्षमतेचे प्रात्यक्षिक सादर केले.


या विविध कार्यक्रमांसाठी मा. श्री. अशोक नेते माजी खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ, मा. श्री. देवराव होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, मा. श्री. कृष्णा गजबे आमदार आरमोरी विधानसभा मतदार संघ, श्री. अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली,  श्री. नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), श्री. यतिश देशमुख अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हे उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालय, गडचिरोली तसेच सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. 


आत्मसमर्पीत जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

1) नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चु


दलममधील कार्यकाळ


1) दिनांक 09 जुलै 1996 मध्ये एटापल्ली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत.

2) माहे डिसेंबर 1997 मध्ये एटापल्ली दलममध्ये पार्टी मेंबर म्हणून बढती. 

3) माहे जानेवारी 1998 मध्ये सिसिएम सोनू याचा अंगरक्षक म्हणून काम केले.

4) माहे नोव्हेंबर 2001 मध्ये सिसिएम सोनूचा गार्ड असतांना एसीएम (एरिया कमिटी मेंबर) या पदावर बढती.

5) माहे सप्टेंबर 2002 मध्ये बदली होऊन भामरागड दलममध्ये कमांडर म्हणून काम केले.

6) ऑक्टोंबर 2006 मध्ये डीव्हीसीएम पदावर बढती व त्यानंतर बदली होऊन कंपनी नं. 04 मध्ये उप-कमांडर म्हणून काम केले.

7) माहे फेब्राुवारी 2009 मध्ये कंपनी नं 04 मध्ये कमांडर या पदावर काम केले.

8) माहे मार्च 2013 मध्ये डीव्हीसिएस/सीवायसीपीएस (कंपनी पार्टी कमिटी सचिव) पदावर काम केले.

9) माहे नोव्हेंबर 2015 मध्ये डीकेएसझेडसी सदस्य (दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी सदस्य) पदावर बढती व यासोबतच एसएमसी (सब मिलिटरी कमिशन मेंबर) व वेस्टर्न सबझोनल कमांडर इन चिफ म्हणून काम केले.

10) कंपनी नं. 10 चा प्रभारी म्हणून त्यांनी काम केले.

11) माहे ऑक्टोंबर 2020 मध्ये दक्षिण गडचिरोली डिव्हीजन सचीव पदावर काम केले.

12) सन 2021 मर्दीनटोला अभियान आणि उत्तर व दक्षिण गडचिरोली विभागाच्या विलीनीकरणानंतर त्याने विभागीय समितीचे प्रभारी व सचिव म्हणून काम केले.

13) गडचिरोली जिल्ह्रातील सिपीआय माओवाद्यांच्या संपूर्ण राजकिय व लष्कर हालचालींचा प्रभारी म्हणून त्याने काम केले.

कार्यकाळात केलेले गुन्हे


      त्याचेवर आजपर्यंत एकुण 179 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 86 चकमक, 15 जाळपोळ इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.



1) संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडीे


दलममधील कार्यकाळ


1) सन 2006 मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती सन 2011 पर्यंत कार्यरत. 

2) सन 2011 मध्ये कसनसूर दलममधून मैनपूर (छ.ग.) येथे बदली.

3) सन 2011 ते 2020 मध्ये माड एरीया मध्ये कार्यरत.

4) माहे जून 2020 मध्ये माड एरीया मधून दक्षिण गडचिरोली एरीयामध्ये बदली होऊन भामरागड दलममध्ये डिव्हीसीएम पदावर आजपावेतो कार्यरत. 


कार्यकाळात केलेले गुन्हे


       तिच्यावर आजपर्यंत एकुण 18 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 07 चकमक, 01 जाळपोळ, इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.



शासनाने जाहिर केलेले बक्षीस.



महाराष्ट्र शासनाने नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चु याचेवर 25 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

महाराष्ट्र शासनाने संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडी हीचेवर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.



आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.


आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चु याला एकुण 15 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडी हिला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.



गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 16 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Post a Comment

0 Comments