गडचिरोल्ली;- सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबरीकरणाची कामे चुकीच्या मार्गाने तुकडे पाडून सोसायटी ला व ठेकेदार ला टक्केवारी घेऊन बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते व गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या संगण मताने सर्रास कामे विकल्या जात आहे त्यामुळे कामाचा दर्जा अत्यन्त नित्कृष्ट दर्जाचा असल्यामुळे पावसाळा आला की कामे पूर्णपणे फुटून व वाहून जातात, व त्याच कामाचे नव्याने निविदा काढून मलिदा खाण्याचे काम अधिकारी, लोक प्रतिनिधी करत आहेत त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी,
सोसायटी ला नियमबाह्य काम देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे व हे नियम बाह्य कामे गडचिरोली जिल्ह्यातच होत आहेत याला गडचिरोली जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी जबाबदार आहेत. त्याची चौकशी करण्यात यावी,
200 -200 मिटरचे तुकडे पाडून दहा -दहा लाखाचे तुकडे पाडून कामे करण्यात आले हे चुकीची पद्धत असून मलिदा खाण्याकरिता लोकप्रतिनिधी व अधिकारीयांच्या संगणमताने कामेकेलेजातआहे. त्यामुळेविकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास अधिकारी व लोकप्रतिनिधी करतआहेत. अशा भ्रष्ट लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकारी यांचे वर तात्काळ कारवाही करावी अन्यथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांचे कार्यालया समोर दिनांक.26/06/2024 पासुन बेमुदत ठिया आंदोलन करीत आहोत अशे सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी म्हटले आहे
0 Comments