हेल्पिंग हॅन्डस अहेरी महिला पदाधिकारी यांचेकडुन आगीत संपूर्ण घर जळालेल्या कटलावार परिवाराला जीवनावश्यक वस्तूंची मदत






राहुल दोंतुलवार//ग्रामिण प्रतिनिधी देवलमरी



अहेरी: दिनांक 1जून 2024 ला  अज्ञात कारणाने आग लागुण घर संपूर्ण घर जळालेल्या सिंधुताई कटलावार यांना सर्वच स्तरावरून थोडीफार मदत मिळत आहे. त्यामुळे सिंधुताई व त्यांच्या मुलाचे उदरनिर्वाह होत आहे. सिंधुताई या मोलमजुरी, धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या परंतु काळाने त्यांचावर घात केल्याने त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. हेल्पिंग हँन्डस अहेरीचे महिला पदाधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सिंधुताई कटलावार यांना जीनावश्यक वस्तूंची भेट देऊन मदत केली आहे. यावेळी हेल्पिंग हँन्डस चे महिला पदाधिकारी पुर्वा दोंतुलवार, सारिका गडपल्लीवर,समीक्षा चिमड्यालवार, रचना बोमकान्टीवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments