तालुका प्रतिनिधी// अनिल कांबळे
वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रह्मपुरी च्या वतीने तालुक्यातील विविध मागण्यांना घेऊन दिनांक 2 7 2024 रोज मंगळवार ला छत्रपती शिवाजी चौक ब्रह्मपुरी या ठिकाणी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय जयदीप खोब्रागडे जिल्हा कार्याध्यक्ष कविताताई गौरकर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर डॉक्टर प्रेमलाल मेश्राम जिल्हा सल्लागार शैलेंद्र बारसागडे जिल्हा महासचिव लीलाधर वंजारी जिल्हाआयटी सेल प्रमुख लीनाताई रामटेके जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी डॉक्टर राहुल मेश्राम जिल्हा सचिव अनिकेत गोडबोले जिल्हा युवा उपाध्यक्ष शुभम मंडपे जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी माननीय सुखदेव प्रधान तालुकाध्यक्ष ब्रह्मपुरी माननीय बनसोड साहेब जिल्हा चंद्रपूर डीएम रामटेके तालुका महासचिव नरेंद्र मेश्राम तालुका महासचिव अनिल कांबळे तालुका उपाध्यक्ष अनंता मेश्राम तालुका उपाध्यक्ष सुकेसणी बनसोड प्रभुजी लोखंडे अखिल कांबळे कमलेश मेश्राम लोकेश चांहादे शारदा घोरमोडे साधना लोखंडे अर्चना गणवीर तसेच बहुसंख्य मान्यवर महिला व पुरुष युवावर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या भव्य धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या भव्य धोरण आंदोलनाचे प्रमुख मागण्या होत्या तालुक्यातील पूर पूरपिळीत गाव लाडज बेलगाव भालेश्वर अहेर नवरगाव नांदगाव पिंपळगाव सोदरी चिखलगाव हरदोली रणमोचंद खरकाडा जे वैनगंगा नदीच्या तीरावरती जे गाव होते त्यांच्या गावांमध्ये पुरांचे पाणी घुसून घराची मोठ्या प्रमाणामध्ये नाशदोष होऊन आर्थिक टंचाई नैराश्य जीवन होत होती व अशा या टंचाईमुळे त्या सर्व पूरपीडित गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे जे पुराच्या पाण्याखाली गाव येतात त्या गावातील काही भाग उंच भागात बसविणे तालुक्यातील जबरान जोत अतिक्रमणधारक शेतकरी कुटुंबांना तात्काळ पट्टे देण्यात यावे तसेच शहरातील झोपडपट्टी धारकांना जागेचे व घराचे पट्टे देण्यात यावे त्याचप्रमाणे ओबीसीची जात निहाय जनगणना करून त्यांचे आरक्षण वाढविण्यात यावे तसेच सर्व योजनेतील घरकुल धारक लाभार्थ्यांचे उर्वरित निधी तात्काळ देण्यात यावे व निधीत वाढ करावी तसेच ब्रह्मपुरी तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा तात्काळ देण्यात यावा तसेच वाढीव वीजदर कमी करण्यात यावा तसेच बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्यावे तसेच विधवा घटस्फोटीत निराधार महिलांना मिळणारा निधी तात्काळ देऊन त्यात वाढ करावी तालुक्यातील महिलांच्या हाताला काम मिळेल यासाठी तालुक्यात कुटीर उद्योग लघुउद्योग यांची व्यवस्था करण्यात यावी या प्रमुख मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले ब्रह्मपुरी ग्रामीण भागातील अन्यायग्रस्त शेतकरी बांधव भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले होत्या त्याचप्रमाणे ब्रह्मपुरीतील झोपडपट्टी धारक आपल्याला पट्टे मिळावे याकरिता बहुसंखयांनी हजर होत्या त्यानंतर माननीय एस डी ओ साहेब ब्रह्मपुरी यांना सर्व शिष्ट मंडळ द्वारे निवेदन देण्यात आले व या आमच्या मागण्या लवकरात लवकर सोडवणूक करण्यात यावी अन्यथा पुढे पुन्हा या मागण्याला घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारला दिले आहे माननीय एस डी ओ साहेबांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना वंचित बहुजन आघाडीचे या मागण्या आहेत त्या कळविण्यात यावे असे सुद्धा सांगण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन माननीय डी एम रामटेके सर तर आभार प्रदर्शन अनिल कांबळे यांनी केले
0 Comments